Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर; मालपाणी लॉन्सवर विविध लाभांचे होणार वाटप

July 30, 2026

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संगमनेरकर अजिंक्य राहाणेची निवृत्ती; भावुक होत व्यक्त केला कृतज्ञता भाव

July 30, 2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुख्यमंत्र्यांच्या काही लाडक्या बहिणी आता होणार ‘दोडक्या’! काही अर्जांची होणार पडताळणी; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या काही लाडक्या बहिणी आता होणार ‘दोडक्या’! काही अर्जांची होणार पडताळणी; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याची आर्थिक ओढाताण होऊ लागल्याने आता या योजनेला काही निकषांच्या पिंजऱ्यात बसवण्यात येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतांच्या बेगमीसाठी सर्व महिलांना सरसकट या योजनेचा लाभ देण्यात आला होता.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 3, 2025Updated:January 3, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, ०३ जानेवारी
मुंबई : वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या महिलांना, तसेच ज्यांच्या घरी चारचाकी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या काही लाडक्या बहिणी आता निवडणुकीआधी सरसकट योजनेचा लाभ देणाऱ्या सरकारसाठी ‘दोडक्या’ होणार आहेत.
‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भातील शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही. मात्र काही अर्जांच्या बाबतीत आम्ही पडताळणीची प्रक्रिया करत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
कोणत्याही योजनेच्या रकमेत वाढ करायची असल्यास ती अध्येमध्ये न होता अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होते. त्यामुळे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाईल, असेही आदिती तटकरे यांनी सांगितले.
उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखांच्या पुढे लाभार्थ्याचे उत्पन्न गेले असेल, तर ती महिला योजनेसाठी पात्र राहणार नाही. काही महिलांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन अर्ज केले होते. काही महिलांचे लग्नानंतर राज्याबाहेर स्थलांतर झाले आहे. चारचाकी वाहने ज्यांच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केला असेल, त्यांच्या नावांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल. तसेच आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत असल्यास ते अर्जदार योजनेसाठी पात्र असणार नाहीत, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
तक्रार आल्यास पडताळणी होणार… वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सध्या सरसकट छाननी होणार नाही. मात्र स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ज्या अर्जांबाबत तक्रार दिली आहे, केवळ त्या अर्जांची पडताळणी करणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून २ कोटी ६३ लाख अर्ज आले होते. त्यापैकी २ कोटी ४७ लाख अर्ज पात्र ठरले. १२ लाख ८७ हजार बहिणींचे बँक खाते आधार कार्डशी जोडले गेले नव्हते. त्यांना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला नाही. दोन कोटी ३४ लाख बहिणींना ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर पर्यंतचे प्रत्येकी १५०० हजार रुपये प्रमाणे साडेसात हजार रुपये बँक खात्यात जमा केले गेले होते. डिसेंबरचा लाभ देण्यासाठी एक हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद केली. आदिती तटकरे यांच्याकडे महिला विकास विभाग कायम राहिल्याने त्यांनी शनिवारी खातेवाटप झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा लाभ देण्याच्या कामाला गती दिली. आतापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या १२ लाख ८७ हजार बहिणींना सहा महिन्यांचे एकूण नऊ हजार बँक खात्यात जमा करण्यात आले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 715
आदिती तटकरे निकष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

संगमनेरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय शिबिर; मालपाणी लॉन्सवर विविध लाभांचे होणार वाटप

By अनंत पांगारकरJuly 30, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत संगमनेर तालुकास्तरीय विशेष शिबिर व कार्यक्रम…

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संगमनेरकर अजिंक्य राहाणेची निवृत्ती; भावुक होत व्यक्त केला कृतज्ञता भाव

July 30, 2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.