Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाजप नेते प्रवीण दरेकर महायुती सरकारचे पहिले लाभार्थी, मुंबई बँकेवर सरकार मेहरबान… विरोधकांची टीका
राजकारण

भाजप नेते प्रवीण दरेकर महायुती सरकारचे पहिले लाभार्थी, मुंबई बँकेवर सरकार मेहरबान… विरोधकांची टीका

मुंबई बँकेत खाते उघडण्यास परवानगी देणारा निर्णय अयोग्य असल्याचे सांगत भाजप नेते प्रवीण दरेकर हे या सरकारचे पहिले लाभार्थी असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने म्हटले आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 4, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, ०४ जानेवारी

मुंबई – मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राज्य सरकारी कर्मचारी व अधिकारी यांना खाते उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मंजुरी देण्यात आली. याआधी प्रवीण दरेकर यांना सायन येथील कोट्यवधी रुपयांची जमीन नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंजुरी देण्यात आली होती, त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्यावर राज्य सरकारची कृपादृष्टी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात दरेकर यांच्या बँकेत शासकीय कर्मचाऱ्यांना खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधीच्या गुंतवणुकीसाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते उघडण्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

सन २०२४-२०२५ या वर्षासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना बँक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच निवृत्ती वेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्यासाठी तसेच शासनाच्या सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी बँकेस प्राधिकृत करण्यासदेखील बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

त्यामुळे महायुती सरकारची दरेकरांवर कृपादृष्टी झाली असल्याची टीका विरोधकांकडून सरकारवर होत आहे. मुंबई बँकेत खाते उघडण्यास परवानगी देणारा निर्णय अयोग्य असल्याचे सांगत भाजप नेते प्रवीण दरेकर हे या सरकारचे पहिले लाभार्थी असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने म्हटले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 862
देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर मुंबई बँक शिवसेना उद्धव ठाकरे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

By अनंत पांगारकरJune 13, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: सरकार दारूबंदी करणार नाही आणि लोक सहजासहजी दारू सोडणार नाहीत,…

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 13, 2026

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.