Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात पुन्हा तिघा तरुणांना मारहाण, धार्मिक वाद वाढण्याची चिन्हे; संतापाचे वातावरण… डॉ. जयश्री थोरात यांनी घेतली जखमींची भेट
गुन्हेगारी

संगमनेरात पुन्हा तिघा तरुणांना मारहाण, धार्मिक वाद वाढण्याची चिन्हे; संतापाचे वातावरण… डॉ. जयश्री थोरात यांनी घेतली जखमींची भेट

विकास बबन आहेर, विकास दीपक गायकवाड व निखील बबन बिडवे हे तरुण रात्री आपल्या गावी जात होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/01/2025Updated:04/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, ०४ जानेवारी
संगमनेर – गेल्या काही दिवसांपासून संगमनेर मध्ये सातत्याने धार्मिक वादाच्या घटना घडत आहे. शनिवारी सायंकाळी अशीच घटना पुन्हा एकदा घडल्याने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील संवेदनशील असलेल्या दिल्ली नाका परिसरात एका पान स्टॉलवर पान घेण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांना किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे.
दरम्यान घटनेची माहिती समजताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. जयश्री थोरात यांनी रुग्णालयात जाऊन जखमी तरुणांची भेट घेतली. यावेळी तरुणांच्या नातेवाईकांनी मारहाण करणाऱ्या विरुद्ध मोठा संताप व्यक्त केला. शांतता असलेल्या संगमनेरमध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल असे वर्तन कोणीही करू नये, मारहाण करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर शासन व्हावे असे थोरात म्हणाल्या.
शनिवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला असून मारहाण करण्यात आलेले दोन्ही तरुण तालुक्यातील निळवंडे येथील असल्याची माहिती समोर येत आहे. समजलेली माहिती अशी, विकास बबन आहेर, विकास दीपक गायकवाड व निखील बबन बिडवे हे तरुण रात्री आपल्या गावी जात होते. संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात एका पान टपरीजवळ ते थांबले असता या ठिकाणी एका समाजातील जमावाने किरकोळ कारणावरून या तीन तरुणांना बेदम मारहाण केली.
या मारहाणीत हे तरुण जखमी झाले. जखमी तरुणांना त्वरित शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
दरम्यान संगमनेरात पोलिसांचा वचक संपल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहे. त्यातच सर्वच अधिकारी नवीन आहेत. शहराचे पुरेशी माहिती कोणत्याही अधिकाऱ्याला नाही. माहितगार पोलिसांचा अभाव असल्याने शहरात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती समाज माध्यमाच्याद्वारे संगमनेरमध्ये पसरताच हिंदुत्ववादी कार्यकर्ते व नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे.
तिघा तरुणांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्याने शहरात सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस काय पावले उचलतात याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख हे शहर पोलीस ठाण्यात आले. पोलीस ठाण्यात जमलेल्या संतप्त कार्यकर्त्यांची त्यांनी चर्चा करून शांततेचे आवाहन करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 5,696
गुन्हेगारी जयश्री थोरात धार्मिक वाद हाणामारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.