Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याच्या अटकेशिवाय मुंबई सोडू नका, सुरेश धस यांचे राज्यातील मोर्चेकरी सरपंचांना आवाहन
राजकारण

संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याच्या अटकेशिवाय मुंबई सोडू नका, सुरेश धस यांचे राज्यातील मोर्चेकरी सरपंचांना आवाहन

संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी बिनभाड्याच्या खोलीत गेले पाहिजे. आका असो की आकाचा बाका, टाका असो. कोणीही असले तरी ते सर्व बिनभाड्याच्या खोलीत गेले पाहिजेत. सुरेश धस यांनी डोक्यावरुन हात फिरवत म्हटले की, यांचा ‘तेरे नाम’ झाला पाहिजे. यांना कोणीही भेटलं नाही पाहिजे. यांचे नातेवाईकही यांना भेटले नाही पाहिजे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला आज एक महिना झाला, मात्र अजूनही सर्व आरोपींना अटक झालेली नाही. हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गु्न्हा दाखल नाही. यामुळे राज्यभरातून रोष व्यक्त होत आहे.

राज्यातील सरपंचांनी आझाद मैदानात परिषदेचे आयोजन करुन संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध केला. या परिषदेला भाजपचे आमदार सुरेश धस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी संतोष देशमुखची हत्या आपल्याला विसरायची नाही. त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसू नका. त्यासोबतच आमदार धस यांनी सरकारकड आरोपींना कोणालाही भेटू देऊ नका, अशी मागणी केली.

संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येनंतर आष्टीचे आमदार सुरेश धस आक्रमक झाले आहेत. लातूर, पुणे येथे निघालेल्या आक्रोश मोर्चामध्येही ते सहभागी झाले. प्रत्येक मोर्चात आमदार धस यांनी बीडमधील माफियाराजचे चित्र राज्यासमोर मांडले. आज सरपंच परिषदेत सहभागी होत आमदार धस यांनी राज्य सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी बिनभाड्याच्या खोलीत गेले पाहिजे. आका असो की आकाचा बाका, टाका असो. कोणीही असले तरी ते सर्व बिनभाड्याच्या खोलीत गेले पाहिजेत. सुरेश धस यांनी डोक्यावरुन हात फिरवत म्हटले की, यांचा ‘तेरे नाम’ झाला पाहिजे. यांना कोणीही भेटलं नाही पाहिजे. यांचे नातेवाईकही यांना भेटले नाही पाहिजे. यांना कोणत्या बिनभाड्याच्या खोलीत टाकायचे याबद्दलही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. असंही आमदार सुरेश धस म्हणाले.

संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींचे लागेबांधे लांबपर्यंत आहेत. आरोपींना कोणालाही भेटू देऊ नका, आरोपींना त्याच्या नातेवाईकांनाही भेटता आलं नाही पाहिजे, अशीही मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येला आपल्याला विसरता येणार नाही. न्याय मिळेपर्यंत आपल्याला संतोष देशमुखांची हत्या लक्षात ठेवावी लागेल. वेळ लागला तरी आपल्याला लढत राहावे लागेल, असे आवाहन त्यांनी सरपंचांना केले.

हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा ३१ डिसेंबरला सीआयडीला पुण्यात शरण आला. वाल्मिक कराड हाच हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप मस्साजोग ग्रामस्थांचा आहे. मात्र वाल्मिक कराडवर अद्याप हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. वाल्मिक कराडवर अवादा एनर्जी कंपनीकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे. खंडणी प्रकरणातच त्याला अटक झाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 451
बीड हत्याकांड संतोष देशमुख सुरेश धस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.