Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची हेकेखोरी कायम, जागतिक तज्ज्ञ मस्क यांना खोटं ठरवत ईव्हीएम योग्यचा दावा
महाराष्ट्र संवाद विशेष

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची हेकेखोरी कायम, जागतिक तज्ज्ञ मस्क यांना खोटं ठरवत ईव्हीएम योग्यचा दावा

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तेव्हा राजीव कुमार बोलत होते. दिल्लीतील सर्व ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान होणार असून ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

देशातील सार्वत्रिक आणि विविध राज्यांच्या मतदानात विरोधकांनी ईव्हीएमवर घेतलेला आक्षेप मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निकालात काढला. जागतिक किर्तीचे तज्ज्ञ एलन मस्क यांनी केलेला ईव्हीएम हॅकिंगचा दावा मोडीत काढताना ज्या देशात ईव्हीएम वापरले जात नाहीत त्या देशातील लोकंच ईव्हीएमला दोष देत असल्याचा दावा कुमार यांनी केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तेव्हा राजीव कुमार बोलत होते. दिल्लीतील सर्व ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान होणार असून ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. 

यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, विरोधकांनी ईव्हीएमबाबत केलेले सर्व आरोप फेटाळले. मात्र, राजीव कुमार यांच्या या भूमिकेवरच काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विरोधकांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. ईव्हीएम कोणत्याही प्रकारे हॅक होऊ शकत नाही, या आपल्या बोलण्याचा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पुनरुच्चार केला. तसेच हे सांगताना अमेरिकन अब्जाधीश एलन मस्क यांच्यावरही टीका केली.

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ईव्हीएममध्ये गडबड करण्यात आल्याचा आरोप हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी केले होते. त्याला उत्तर देताना आयुक्त राजीव कुमार म्हणाले, ईव्हीएमबाबत अविश्वसनीयता तसेच कोणत्याही त्रुटीचा कोणताही पुरावा नाही. ईव्हीएममध्ये व्हायरस किंवा बग तसेच, अवैध मतांचा प्रश्नच उद्भवत नाही. यामध्ये काही गडबड होणे शक्य नाही. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय सातत्याने वेगवेगळ्या निर्णयांत हेच सांगत आहेत आणि आता याहून अधिक काय सांगता येईल? ईव्हीएममधील गडबडीचे आरोप निराधार आहेत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

राजीव यांचा दावा नवी दिल्लीतील काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला. राजीव कुमार यांच्या या दाव्याशी आपण अजिबात सहमत नाही. ईव्हीएममध्ये गडबड होऊ शकत नाही, असे निवडणूक आयोग हे कसे म्हणू शकते? पूर्वीही गडबड व्हायची. आता बनावट पद्धतीने मतदान केले जाऊ शकते; त्यामुळे गडबड होत नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. अशा स्थितीत निवडणूक आयोगाने त्यांच्या शंकांचे निरसन करायला हवे. जर त्यांना सर्व काही योग्य वाटत असेल आणि त्यांची प्रक्रिया इतकी पारदर्शक असेल तर लोकांना शंका का येत आहेत, हा देखील एक प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 610
ईव्हीएम दिल्ली विधानसभा निवडणूक निवडणूक आयोग राजीव कुमार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने एमडी ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात…

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.