Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदारांच्या पुढाकारानंतर बस स्थानकाबाहेरील रस्त्यालगतची अतिक्रमण पालिकेने काढली
महाराष्ट्र संवाद विशेष

आमदारांच्या पुढाकारानंतर बस स्थानकाबाहेरील रस्त्यालगतची अतिक्रमण पालिकेने काढली

यामुळे मोक्याच्या व महत्त्वाच्या बस स्थानक परिसरात वाहतुकीची मोठी समस्या बनली आहे. बस स्थानकासमोर असलेला रिक्षा थांबा देखील इतरत्र हलवावा अशी मागणी आहे. मात्र याकडे देखील पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाकडून सोयीस्कर दुर्लक्ष होतांना दिसत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी पुढाकार घेतल्यानंतर रस्त्यावरच हातगाड्यांच्या माध्यमातून अतिक्रमणे करून वाहतुकीची कोंडी निर्माण करणारी बस स्थानकाबाहेरील अतिक्रमण पालिकेच्या माध्यमातून हटविण्यात आली आहे. पालिकेच्या माध्यमातून कोणतेही नुकसान न होता व्यावसायिकांनी अतिक्रमणे काढून घेतल्याने वारंवार या परिसरात अतिक्रमण मोहीम हटावचा फार्स ठरलेली ही अतिक्रमणे खरंच कायमस्वरूपी हटविली गेली का, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. बस स्थानक परिसर मोकळा करण्यात आला असला तरी शहराच्या अन्य भागात नगरपालिकेने ही कारवाई करण्याची आवश्यकता नागरिकांमधून व्यक्त होत आहे. वारंवार होणारी अतिक्रमणे संगमनेरकरांसाठी डोकेदुखी बनली असून ही अतिक्रमणे काढण्याची संकेत मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिले होते.

याचाच एक भाग म्हणून मंगळवारी करण्यात आलेल्या कारवाई बस स्थानक परिसरातील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाजवळील फुटपाथ मोकळे करण्यात आले आहेत. या फुटपाथ बाहेर लावण्यात आलेले लोखंडे अँगल जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले आहे. यावेळी बघायची गर्दी झाली होती.

फूटपाथवर गेल्या अनेक वर्षापासून बिनधास्तपणे फेरीवाले आपला व्यवसाय करत आहे. यामुळे मोक्याच्या व महत्त्वाच्या बस स्थानक परिसरात वाहतुकीची मोठी समस्या बनली आहे. बस स्थानकासमोर असलेला रिक्षा थांबा देखील इतरत्र हलवावा अशी मागणी आहे. मात्र याकडे देखील पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाकडून सोयीस्कर दुर्लक्ष होतांना दिसत आहे. मंगळवारी काढण्यात आलेली अतिक्रमण ही मर्यादित स्वरूपाची तसेच कोणालाही नुकसान न पोहोचविणारी अशी होती.

आता संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला केलेल्या सूचनेप्रमाणे नगरपालिका, पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग मोठी अतिक्रमण मोहीम कधी राबवते याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,037
अतिक्रमण संगमनेर नगर परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.