Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरचा वादग्रस्त टोल नाका बंद होण्याची आशा मावळली, आंदोलनाची ऐसी की तैसी; टोल ठेकेदाराचे भाजप कनेक्शन… शिवसेना पदाधिकाऱ्याचा आरोप
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरचा वादग्रस्त टोल नाका बंद होण्याची आशा मावळली, आंदोलनाची ऐसी की तैसी; टोल ठेकेदाराचे भाजप कनेक्शन… शिवसेना पदाधिकाऱ्याचा आरोप

विशेष म्हणजे मोर्चामध्ये संगमनेर चे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे सहभागी झाले होते. खताळ हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार असल्याने आणि या दोन्ही आमदारांनी आक्रमकपणे टोल नाक्याविरोधात भाष्य केल्याने संबंधितांवर कारवाईसोबतच टोल नाका बंद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/01/2025Updated:09/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – गेल्या अनेक महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेला संगमनेरचा टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चा नंतर सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे टोल नाका बंद होण्याची आशा मावळली आहे. तसेच या टोल नाक्याच्या ठेकेदाराचे भाजप कनेक्शन असल्याचा आरोप शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केला आहे.

समाज माध्यमात एका पोस्टच्या माध्यमातून कतारी यांनी याचा उलगडा केला आहे. कोणी कितीही आरडाओरडा केला तरी हा टोल बंद होऊ शकत नाही. भाजप-शिवसेनेशी (शिंदे गट) संबंधित आंदोलकांना थेट नागपूरहून फोन आल्याने या कार्यकर्ते, आंदोलकाचा टोल नाक्या विरोधातील आवाज बंद झाला आहे. त्यामुळे संगमनेरात या टोलनाक्यावरून मोठे वादंग होऊन देखील टोल नाका बंद करण्याची मागणी करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा टोल नाका बंद होणार नसल्याने हिरमोड झाला आहे.

या टोलनाक्याचा ठेकेदार नागपूरचा भाजपशी संबंधित नेता असून त्याची भागीदारी शिवसेना शिंदे गटाच्या एका माजी आमदार सोबत असल्याचे म्हटले असून यासंदर्भात जर कोणाला खात्री करावयाची असेल तर त्यांनी एनएचएआयच्या (NHAI) अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे सांगताना त्यांनी या टोलनाक्याचे भाजप-शिवसेना कनेक्शन समोर आणले आहे.

काही दिवसांपूर्वी या टोल नाक्यावर नाका कर्मचाऱ्यांकडून भाजपाशी संबंधित कासट बंधू आणि त्यांच्या मित्राला मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. या संदर्भात पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद ठरल्याने संबंधितांवर कारवाई करण्यासाठी व्यापारी असोसिएशनसह विविध संस्था संघटना आणि संगमनेरकरांनी प्रांताधिकारी, पोलीस उपाधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. संबंधितांवर कारवाई आणि आठ दिवसात टोल नाका बंद अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली होती. मात्र अद्यापही परिस्थिती जैसे थे आहे.

विशेष म्हणजे मोर्चामध्ये संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे सहभागी झाले होते. खताळ हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार असल्याने आणि या दोन्ही आमदारांनी आक्रमकपणे टोल नाक्याविरोधात भाष्य केल्याने संबंधितांवर कारवाईसोबतच टोल नाका बंद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. तसेच मारहाण प्रकरणातील मारहाणीचा आरोप असलेल्या आरोपींना संगमनेर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळाला. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांचेच सहकार्य असल्याचा आरोप देखील मोर्चेकर्‍यांनी केला होता. तर या प्रकरणातील ज्या मुलांमुळे वाद झाला त्या मुलांचा जामीन पोलिसांच्या भूमिकेमुळे नाकारला गेला. मारहाण करणाऱ्यांना मोकळे सोडून या मुलांना पोलिसांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

त्यातच आता राज्य सरकारने येत्या एक एप्रिल पासून सर्व वाहनांना फास्टटॅग अनिवार्य केल्याने हाच नियम या टोलनाक्यालाही लागू होणार असल्याने टोल नाका बंद होण्याची आशा आता मावळली. त्यामुळे संगमनेरकरांच्या या आंदोलनाला सरकारच्या लेखी किंमत नसल्याचे देखील समोर आले आहे.

संगमनेर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केलेल्या या आरोपामुळे सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या टोल नाक्याला आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना नेमकं कोण पाठीशी घालत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 21,049
अमर कतारी अमोल खताळ टोल नाका सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026

कौठेमलकापूर सौरऊर्जा प्रकल्पाला स्थगिती; औद्योगिक वसाहतीचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; आमदार अमोल खताळ यांच्या मागणीला यश

23/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

By Annant Ppangarkar24/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या यशोधन जनसंपर्क…

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026

शिव्यांची नव्हे तर ओव्यांची संगत धरा; ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांचे प्रतिपादन

24/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.