Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमची शाळा कोणत्याही कॉन्व्हेंटपेक्षा कमी नाही! जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेने अशी बदलली शाळेची रूपरेषा, वृषाली कडलग यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार’ जाहीर

03/11/2026

संगमनेरमध्ये पहिल्या महिला शिवसेना शाखेचे उद्‌घाटन; दादागिरी व दहशतीचे दिवस संपले: आमदार अमोल खताळ

03/11/2026

मंगळवार दि. ०३ नोव्हेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाच्या राशिभविष्य

03/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरसह राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आमदार सत्यजित तांबेनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
राजकारण

संगमनेरसह राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आमदार सत्यजित तांबेनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत संगमनेर शहरातून वाहणाऱ्या म्हाळुंगी नदी सुधार प्रकल्पासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निधी मंजूर करावा. या माध्यमातून म्हाळुंगी नदी सुधार प्रकल्प राबविता येईल. तांबे यांनी राज्यातील लघु वृत्तपत्र क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्याची देखील मागणी केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/01/2025Updated:10/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई – उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यासाठी महत्वाच्या असलेल्या अनेक विषयांवर गेले अनेक दिवस विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे पाठपुरावा करत आहे. यातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत, अनेक प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर तांबे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा नव्याने पदभार स्वीकारलेल्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करत निवेदन दिले.

संगमनेरसह राज्यातील विविध प्रश्नांसाठी आमदार तांबे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत. संबंधित मंत्र्यांकडून विविध विषयांचा पाठपुरावा त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केला आहे.

आपल्या कामाचे प्रगती पुस्तक मांडणारे ते राज्यातील एकमेव आमदार आहेत. सभागृहात आणि सभागृहाबाहेर केलेल्या कामांचा आढावा ते आपल्या मतदारांना समाज माध्यमातून सातत्याने देत असतात. सभागृहात अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित करत समस्यांना वाचा फोडली आहे.

नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यात डॉक्टरांप्रमाणे वकिलांच्या संरक्षणासाठी कायदा करण्याची मागणी केली आहे. संगमनेर मधील पोलीस वसाहत प्रकल्पाचा आराखडा आधुनिक पद्धतीने तयार करून हा प्रकल्प जलदरीत्या मुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करण्याची मागणी तांबे यांनी केली आहे.

राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या व सीसीएमपी डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत बैठक आयोजित करावी. या बैठकीच्या माध्यमातून डॉक्टरांचे प्रश्न मार्गी लागू शकतील. अहमदनगरच्या कौटुंबिक न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीशांची नेमणूक करावी. निळवंडे प्रकल्पाच्या नियोजनाबाबत काही सूचना व मागण्या त्यांनी यावेळी केल्या.

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदान व अंशतः अनुदानावर नियुक्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिष्टमंडळास वेळ देण्याची, ग्रामीण भागातील महाराष्ट्र रुरल ऍडव्हर्टायझिंग असोसिएशनच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्याची मागणी तांबे यांनी केली आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत संगमनेर शहरातून वाहणाऱ्या म्हाळुंगी नदी सुधार प्रकल्पासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निधी मंजूर करावा. या माध्यमातून म्हाळुंगी नदी सुधार प्रकल्प राबविता येईल. तांबे यांनी राज्यातील लघु वृत्तपत्र क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्याची देखील मागणी केली.

या प्रमुख मागण्यांसह तांबे यांनी राज्याच्या हिताच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती त्यांना केली असल्याचे म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 959
देवेंद्र फडणवीस सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये पहिल्या महिला शिवसेना शाखेचे उद्‌घाटन; दादागिरी व दहशतीचे दिवस संपले: आमदार अमोल खताळ

03/11/2026

जेव्हा पालकमंत्र्यांच्या हातात क्रिकेटची बॅट येते तेव्हा….

01/11/2026

संगमनेर तालुका कोणाची जहागीरदारी नाही; जनतेने परिवर्तन घडविले: आमदार अमोल खताळ

01/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

आमची शाळा कोणत्याही कॉन्व्हेंटपेक्षा कमी नाही! जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेने अशी बदलली शाळेची रूपरेषा, वृषाली कडलग यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार’ जाहीर

By Annant Ppangarkar03/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अकोले तालुक्यातील गणोरे येथील शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली सुनील…

संगमनेरमध्ये पहिल्या महिला शिवसेना शाखेचे उद्‌घाटन; दादागिरी व दहशतीचे दिवस संपले: आमदार अमोल खताळ

03/11/2026

मंगळवार दि. ०३ नोव्हेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाच्या राशिभविष्य

03/11/2026

संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा; दोन्ही गटांतील बेचाळीस जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

02/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.