Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पंतप्रधान मोदींप्रमाणे प्रशासनावर मुख्यमंत्री फडणवीसांचे एकहाती नियंत्रण… मंत्र्यांकडे खाजगी व्यक्तींच्या नियुक्तीला मनाई
राजकारण

पंतप्रधान मोदींप्रमाणे प्रशासनावर मुख्यमंत्री फडणवीसांचे एकहाती नियंत्रण… मंत्र्यांकडे खाजगी व्यक्तींच्या नियुक्तीला मनाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा धक्कादायक निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयावरून आता उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई : महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. वेगवेगळे निर्णय घेत प्रशासनावर एकहाती अंमल बसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशातच त्यांच्या एका नवीन निर्णयामुळे पुन्हा एकदा महायुतीच्या मंत्र्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नव्या सरकारमध्ये मंत्री आस्थापनेवर खासगी सचिव अथवा विशेष कार्य अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर खासगी व्यक्तीच्या नियुक्तीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मंत्र्यांना धक्का बसला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी महायुतीच्या आमदारांची शाळा घेतली. त्यावेळेस त्यांनी या सर्व आमदारांना महत्त्वाचा कानमंत्र दिला. सरकारी अधिकाऱ्यांसोबत नम्रपणे बोला, बदली आणि दलाली अशा कामापासून स्वत:ला दूर ठेवा, असे पंतप्रधान मोदी यांनी या आमदारांना सांगितले. यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा धक्कादायक निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयावरून आता उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

मंत्री आस्थापनेवर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मान्यता दिली. मंत्री आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मंत्र्यांची मागणी मान्य केली आहे. असे असले तरी, मंत्री आस्थापनेवर खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी म्हणून खासगी किंवा सेवानिवृत्त व्यक्तींची नियुक्ती करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी अमान्य केली आहे.

मंत्र्यांना दोन खासगी स्वीय सहाय्यक नेमण्याची परवानगी देताना त्यांच्या नियुक्तीसाठी देखील मुख्यमंत्र्यांची मान्यता घ्यावी लागेल, असे स्पष्ट आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन महिनाभराचा कालावधी लोटल्यानंतरही मंत्री आस्थापनेवरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना अद्याप मान्यता मिळालेली नव्हती. वास्तविक, बहुतांश मंत्री आपल्या विश्वासातील अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी–कर्मचाऱ्यांची आपल्या आस्थापनेवर नियुक्ती करून मान्यतेसाठीचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागास पाठवतात. मात्र, मंत्री आस्थापनेवर किती कर्मचारी आणि कोणाची नियुक्ती करायची याबाबतचे सरकारचे धोरण निश्चित झाले नसल्याने या नियुक्त्या रखडल्या होत्या. आणि आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशामुळे मंत्र्यांच्या त्या इच्छेवर पाणीच फेरले आहे.

मंत्र्यांकडील मंजूर पदे…

नव्या धोरणानुसार मुख्यमंत्री सचिवालयात भारतीय प्रशासन सेवेतील तीन अधिकाऱ्यांसह 164 पदे, उपमुख्यमंत्र्यांकडे भारतीय प्रशासन सेवेतील दोन अधिकाऱ्यांसह 72 पदे, मंत्र्यांकडे 16 तर राज्यमंत्र्यांना 14 पदे मंजूर करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना खासगी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून शासकीय, निमशासकीय तसेच खासगी व्यक्तीच्या नियुक्तीची मुभा असेल.

आदेश काय?

मंत्र्यांकडील खासगी स्वीय सहाय्यक नेमताना उमेदवार किमान पदवीधर असावा तर सरकारी, निमसरकारी सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना त्यांचे 10 वर्षातील गोपनीय अहवाल, कर्तव्य परायणता, सचोटी, चारित्र्य याचा विचार करून नियुक्त्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 482
खाजगी सचिव देवेंद्र फडणवीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.