अहिल्यानगर – अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेच्या काळात अकार्यकारी पदावर बदली केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय), पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) अशा २० अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या आहेत.
शुक्रवारी ओला यांनी या बदल्यांचे आदेश काढले. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संगमनेर पोलीस उपअधीक्षकांचे वाचक असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांची घारगाव (संगमनेर) पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. याशिवाय कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारूती मुळुक यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांना अर्ज शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे टीएमसीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. दरम्यान, त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
बदली करण्यात आलेले सहायक पोलीस निरीक्षक कंसात नव्या नियुक्तीचे ठिकाण – कल्पेश दाभाडे (घारगाव पोलीस ठाणे, संगमनेर), कल्पना चव्हाण (तोफखाना पोलीस ठाणे, अहिल्यानगर), विकास काळे (संगमनेर पोलीस ठाणे), कुणाल सपकाळे (कोतवाली पोलीस ठाणे, अहिल्यानगर), विवेक पवार (राहुरी पोलीस ठाणे), एकनाथ ढोबळे (श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे), संदीप हजारे (अकोले पोलीस ठाणे) व अमोल पवार (नेवासे पोलीस ठाणे)
बदली करण्यात आलेले पोलीस उपनिरीक्षक कंसात नव्या नियुक्तीचे ठिकाण – महेश शिंदे (संगमनेर तालुका पोलीस ठाणे), योगेश शिंदे (राहता पोलीस ठाणे), पल्लवी वाघ (भिंगार कॅम्प पोलीस ठाणे, अहिल्यानगर), गजेंद्र इंगळे, (भिंगार कॅम्प पोलीस ठाणे, अहिल्यानगर), उमेश पतंगे (नगर तालुका पोलीस ठाणे, अहिल्यानगर), ज्योती डोके (राहुरी पोलीस ठाणे), सज्जन नाऱ्हेडा (कर्जत पोलीस ठाणे), दीपक पाठक (शनिशिंगणापूर पोलीस ठाणे), निवांत जाधव (शिर्डी पोलीस ठाणे), सतीश डौले (श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे), विक्रांत कचरे, (शिर्डी पोलीस ठाणे)


