Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटरची जबाबदारी शिंदे, फडणवीसांची, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर जोरदार टीका…
राजकारण

अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटरची जबाबदारी शिंदे, फडणवीसांची, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर जोरदार टीका…

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये स्वतःला हिरो बनवून घेण्यासाठी या एन्काऊंटरचे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने फक्त मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू आता समोर येत आहे, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई- 

बदलापूर येथील चिमुरड्यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तत्कालीन सरकारचे फेक नरेटिव्ह उघड पाडलेत. न्यायालायाने चौकशी अहवालात हे एन्काउंटर घडवून आणल्याचं म्हटल्याने सरकारची चांगलीच कोंडी झाली. या एन्काऊंटरला पोलीस जितके जबाबदार आहेत, तितकेच जबाबदार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत काढण्यात आलाय. पोलिसांकडील बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसे नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आलंय. बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजपा संस्थाचालकांवर कारवाई झाली नाही, तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचं फेक एन्काऊंटर करून भाजपाशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आलंय, असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मांडलेल्या फेक नरेटिव्हची आज उच्च न्यायालयाने पोलखोल केलीय, असे ते म्हणाले. या एन्काऊंटरची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे, तितकी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे, असा आरोप त्यांनी केलाय. कारण ‘एकनाथचा एक न्याय‘ आणि ‘देवाभाऊचा दुसरा न्याय‘ म्हणून स्वतःला हिरो बनवून घेण्यासाठी या एन्काऊंटरचे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने फक्त मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू समोर येतोय, अशी टीका त्यांनी केलीय. वडेट्टीवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत समोर आला आहे. त्याचप्रमाणे बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसे नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजपा संस्थाचालकांवर कारवाई झालीच नाही, तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर करून भाजपाशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मांडलेल्या फेक नरेटिव्हची आज उच्च न्यायालयाने पोलखोल केली आहे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये स्वतःला हिरो बनवून घेण्यासाठी या एन्काऊंटरचे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने फक्त मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू आता समोर येत आहे, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 495
अक्षय शिंदे एन्काऊंटर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस विजय वडेट्टीवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.