Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आरक्षणाशिवाय होणाऱ्या जिल्हा बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती देण्याची मागणी, आरक्षणाशिवाय नोकर भरती म्हणजे सामाजिक न्याय तत्त्वाचा भंग…. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सामाजिक

आरक्षणाशिवाय होणाऱ्या जिल्हा बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती देण्याची मागणी, आरक्षणाशिवाय नोकर भरती म्हणजे सामाजिक न्याय तत्त्वाचा भंग…. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

राज्य शासनाने आरक्षणाशिवाय नोकर भरती करण्यास परवानगी दिल्याचा बँकेचा दावा आहे. असे असेल तर शासनाने संविधानाच्या कलम ३४०, ३४१, ३४२ कडे दुर्लक्ष करून सामाजिक न्याय तत्त्वाचा भंग केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर –

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सामाजिक व समांतर आरक्षणाशिवाय ७०० जागांवर नोकर भरती करण्याची प्रक्रिया सुरू असून या नोकर भरतीला स्थगिती देण्याची मागणी पुरोगामी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. बँकेच्या आरक्षणाशिवाय होणाऱ्या नोकर भरती निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला आहे.

या संदर्भातील मागण्यांचे निवेदन अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना देण्यात आले आहे. यावेळी हिरालाल पगडाल, अशोक गायकवाड, ज्ञानेश्वर राक्षे, के. जी. भालेराव, राजीव साळवे, अरविंद सांगळे, फ्रान्सिस सोनवणे, सुनील क्षेत्रे, प्रा. भीमराव पगारे, सुभाष ब्राह्मणे, राजाभाऊ अवसक, नितीन कसबेकर, सिताराम राऊत, अनिकेत घुले आधी पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्याचे अग्रेसर बँक असून या बँकेला अनुसूचित जाती, तसेच जमाती, भटक्या व विमुक्त जाती, इतर मागास जातीत विशेष मागास प्रवर्ग यांच्याकरिता त्यांच्या सेवकांमध्ये ५२ टक्के राखीव जागा ठेवणे बंधनकारक आहे.

बँकेचे सेवक भरतीचे नियम सहकार खात्याकडून मंजूर करून घेतलेले असून त्यात राखीव जागेची तरतूद आहे. या नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नसताना, जिल्हा मध्यवर्ती बँकेने आरक्षणाशिवाय नोकर भरती करण्याचा घाट घातला आहे. हा आरक्षणाच्या धोरणाला विरोध करणाऱ्या सामाजिक न्याय विरोधी शक्तींचा डाव आहे. यात जिल्हा बँकेचे संचालक मंडळ सामील असल्याची शंका उपस्थित करण्यात आली आहे.

७०० जागांवर होणाऱ्या या नोकर भरतीमध्ये एससी, एनटी, व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी यांच्या जागांचा समावेश असून सर्व नोकर भरती आरक्षणाशिवाय करण्याचा घाट घातला आहे. राज्य शासनाने आरक्षणाशिवाय नोकर भरती करण्यास परवानगी दिल्याचा बँकेचा दावा आहे. असे असेल तर शासनाने संविधानाच्या कलम ३४०, ३४१, ३४२ कडे दुर्लक्ष करून सामाजिक न्याय तत्त्वाचा भंग केला आहे. यामुळे संविधानाचे उल्लंघन होत असून वंचित घटकांवर अन्याय होत आहे.

त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आरक्षणाशिवाय होणाऱ्या नोकर भरती करण्याच्या निर्णयाला आमचा तीव्र विरोध असेल. राज्य शासनाने या नोकर भरतीला स्थगिती द्यावी अन्यथा या मागणीसाठी तीव्र आंदोलन केले जाईल. जिल्हाधिकारी सालीमठ या प्रकरणी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 440
अनिकेत घुले अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरती सिताराम राऊत हिरालाल पगडाल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

By Annant Ppangarkar11/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या…

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.