Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गावचा सरपंच होऊ दिले नाही म्हणून संगमनेरमध्ये उपसरपंचाला झालेल्या मारहाण प्रकरणी १९ दिवसानंतर गुन्हा दाखल, आरोपींमध्ये यांचा आहे समावेश…
गुन्हेगारी

गावचा सरपंच होऊ दिले नाही म्हणून संगमनेरमध्ये उपसरपंचाला झालेल्या मारहाण प्रकरणी १९ दिवसानंतर गुन्हा दाखल, आरोपींमध्ये यांचा आहे समावेश…

यावेळी सोमनाथ गीते याने "तू मला गावचा सरपंच होऊ दिले नाही, असे म्हणून तू जास्त माजला आहे" असा दम देत वाईट शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सोमनाथ गीते व अमोल गीते यांनी लोखंडी गज आणून सानप यांच्या डाव्या हाताच्या खांद्यावर मारले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. २७-

संगमनेर शहरामध्ये शासकीय विश्रामगृहासमोरील चांदणी खानावळी समोर ‘गावचा सरपंच होऊ दिले नाही’, या कारणावरून झालेल्या हाणामारी प्रकरणी शनिवारी रात्री १९ दिवसानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये सोमनाथ रावबा गीते, अमोल सोमनाथ गीते (दोघे रा. सोनोशी, ता. संगमनेर) व आकाश संतोष चकोर (रा. पिंपळे ता. संगमनेर) यांचा समावेश आहे. ७ जानेवारीला घडलेल्या या प्रकाराची शहरात चर्चा सुरू होती. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल १९ दिवसांचा कालावधी लागला आहे.

शहर पोलीस ठाण्यात सोनोशी येथील उपसरपंच राजेंद्र तुकाराम सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या तिघांविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ६४, भारतीय न्याय संहिता कलम ११५, ११८(१), ३२४(२), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार धनंजय महाले या प्रकरणी पुढील तपास करत आहे.

अधिक माहिती अशी, फिर्यादी राजेंद्र सानप हे त्यांचा मित्र अनिकेत दशरथ गीते यांच्यासह संगमनेर येथे आले असताना शासकीय विश्रामगृह समोरील चांदणी खानावळीमध्ये जेवणासाठी थांबले होते. मात्र तेथे जेवण न मिळाल्याने ते खानावळी बाहेर समोर उभे असताना त्याचवेळी त्यांच्या सोनोशी गावातील सोमनाथ रावबा गीते, अमोल सोमनाथ गीते व आकाश चकोर हे तेथे आले.

यावेळी सोमनाथ गीते याने “तू मला गावचा सरपंच होऊ दिले नाही, असे म्हणून तू जास्त माजला आहे” असा दम देत वाईट शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सोमनाथ गीते व अमोल गीते यांनी लोखंडी गज आणून सानप यांच्या डाव्या हाताच्या खांद्यावर मारले. सोबत असलेल्या आकाश चकोर याने देखील लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.

यावेळी सानप यांच्यासोबत असलेल्या मित्र अनिकेत याने भांडणात मध्यस्थी करत सोडवा सोडवी केली. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेले. मात्र मारहाणीत सानप यांच्या डाव्या खांद्याला आणि डाव्या हाताच्या बोटांना मार लागला होता.

दरम्यान घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सानप यांना झालेल्या मारहाणीबाबत वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने सानप यांच्या तक्रारीवरून सोमनाथ रावबा गीते, अमोल सोमनाथ गीते व आकाश संतोष चकोर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,696
राजेंद्र सानप सोमनाथ गीते हाणामारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

By Annant Ppangarkar11/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या…

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.