Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यात संतापाची लाट, तालुक्याची मोडतोड सहन करणार नाही : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा
राजकारण

संगमनेर तालुक्यात संतापाची लाट, तालुक्याची मोडतोड सहन करणार नाही : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा

राजकीय हेतू ठेवून संगमनेर तालुक्याची मोडतोड करण्याचा कुटील डाव समोर आल्याने संगमनेर तालुक्यातील तरुणाईमध्ये मोठी संतापाची लाट निर्माण झाली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/01/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. २८-

संगमनेरचा विकास रोखू पाहणाऱ्यांनी आता विकासाबरोबरच येथील एकजूट मोजण्यासाठी राजकीय उद्देश समोर ठेवून प्रशासकीय सोयीच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रस्तावित आश्वी बुद्रुक येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड सुरू केली असून कोणत्याही स्थितीत सत्ताधाऱ्यांचा हा प्रकार सहन केला जाणार नसल्याचा इशारा राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

अहिल्यानगर जिल्हाधिकारी महसूल शाखा यांनी पत्र क्र. प्रा. फे.ब.2022 /प्रक्र. 94/म -10, दिनांक 17 जानेवारी 2023 या राजकीय दबावातून काढलेल्या अध्यादेशातून संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याबाबत घाट घातला आहे. खरे तर संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असूनही संगमनेर शहर हे मध्यवर्ती असल्याने सर्वांच्या सोयीचे आहे. याचबरोबर शहरात मध्यवर्ती असे भव्य तहसील व प्रांताधिकारी कार्यालय आहे. मात्र नव्याने प्रशासकीय सोयीच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड करण्याचा डाव आखला जात आहे तो कदापिही सहन केला जाणार नाही.

संगमनेर शहराच्या अगदी जवळ असलेली गावेदेखील संगमनेर तहसील कार्यालयापासून वेगळी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होणार आहे. तालुक्यातील जनतेला राजकीय दबावातून जाणून-बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो कदापि सहन करणार नाही. हा स्वातंत्र्य सैनिकांचा तालुका असल्याने या अन्यायकारक निर्णयाविरोधात मोठे जन आंदोलन उभारले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

नव्याने प्रस्तावित आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालयात आश्वी बुद्रुक महसूल मंडळातील आश्वी, प्रतापपूर, उंबरी बाळापुर, औरंगपूर, सादरपूर, चिंचपूर बुद्रुक व खुर्द, निमगाव जाळी, रहिमपूर, ओझर खुर्द ,मनोली या गावांचा समावेश आहे. तर शिबलापुर महसूल महसूल मंडळात पानोडी, आश्वी खुर्द, खळी, पिंपरी लौकी अजमपुर, चनेगाव, झरेकाठी, दाढ खुर्द, मालूंजे, डीग्रस, शेडगाव, हंगेवाडी यांचा समावेश आहे. पिंपरणे महसूल मंडळात जाखुरी, अंभोरे, कोळवाडे, ओझर बुद्रुक, कनोली, कनकापूर, कोल्हेवाडी, जोर्वे, निंबाळे, वाघापूर ,खराडी, रायते या गावांचा समावेश आहे.

तर संगमनेरलगत असलेल्या संगमनेर खुर्द या महसूल मंडळात संगमनेर खुर्द, खांडगाव, वैदुवाडी, चंदनापुरी, आनंदवाडी, झोळे, रायतेवाडी, देवगाव, निमगाव टेंभी, शिरापूर, निमज, सावरगाव तळ, पिंपळगाव माथा, हिवरगाव पावसा या गावांचा समावेश आहे. समनापुर महसूल मंडळात कोकणगाव, कोंची, मांची, शिवापूर, पोखरी हवेली, कुरण, वडगाव पान, माळेगाव हवेली, सुकेवाडी, खांजापुर या गावांचा समावेश आहे.

संगमनेर खुर्द व समनापुर हे महसूल मंडळ संगमनेर शहराच्या लगत आहे. याशिवाय पिंपळगाव माथा, सावरगाव तळ हे पश्चिमेतील गावे ही आश्वीला जोडले आहेत. तसेच सुकेवाडी, खाजापुर, वडगाव पान ही गावे आश्वीला जोडली. हा कोणता न्याय आहे असा प्रश्न या गावांमधील नागरिकांनी विचारला आहे.

हा अध्यादेश समाज माध्यमात व्हायरल होताच तालुक्यातील गावांमध्ये संतापाची मोठी लाट निर्माण झाली आहे. संगमनेरचा विकास मोडणाऱ्यांनी डाव साधला, अशी भावना संगमनेर तालुक्यात निर्माण झाली असून या कुटील कारस्थानाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा गावागावातून दिला जात आहे.

संगमनेर तालुक्यात संतापाची लाट… माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा एक परिवार म्हणून राहिला. मात्र महायुतीची सत्ता येताच दोनच महिन्यांमध्ये संगमनेर तालुका तोडण्याचा डाव आखला जात आहे. राजकीय हेतू ठेवून संगमनेर तालुक्याची मोडतोड करण्याचा कुटील डाव समोर आल्याने संगमनेर तालुक्यातील तरुणाईमध्ये मोठी संतापाची लाट निर्माण झाली आहे. गावागावांमधून या कारस्थानाचा निषेध होत असून सोशल माध्यमांवर तालुक्याचा घात झाला. अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. आता हे आंदोलन अधिक तीव्र होणार असून संगमनेर तालुक्यामध्ये मोठी संतापाची लाट निर्माण झाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,786
आश्र्वी बुद्रुक अप्पर तहसील कार्यालय तालुका विभाजन बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.