Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले, दोघे पळाले… संशयितांकडून गावठी कट्टा, कोयता, चार मोबाईल, इंडीका कार हस्तगत; तालुका पोलिसांची कामगिरी
गुन्हेगारी

दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले, दोघे पळाले… संशयितांकडून गावठी कट्टा, कोयता, चार मोबाईल, इंडीका कार हस्तगत; तालुका पोलिसांची कामगिरी

संशयित कारची झडती घेतली असता त्यात एक देशी बनावटीचे गावठी पिस्तुल, चार जिवंत काडतुस, कोयता, मिरची पुड, चार मोबाईल आढळून आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/01/2025Updated:29/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. २९- 

रात्रीच्या वेळी गस्त घालत असतांना संगमनेर तालुका पोलिसांनी निळवंडे शिवारात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इंडिका कारचा पाठलाग करून दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले तर या कारवाईदरम्यान दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी पकडलेल्या संशयित आरोपींकडून गावठी कट्टा, कोयता, चार मोबाईल, इंडिका कार जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिली.

मंगळवारी (दि. २८) पहाटे साडे पाच वाजेच्या तालुका पोलीस स्टेशनचे गस्तीचे अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल संपत जायभाये, चालक कोकणे हे मोबाईल पेट्रोलींग करून निळवंडे मार्गे करुन वडगावपानकडे येत असतांना त्यांना समोरून एक पांढऱ्या रंगाची इंडिका कार (क्र. एम. एच. २३ ई ६८४७) हि निळवंडे-कवठे कमळेश्वर रस्त्यांने वेगांने जात असतांना दिसली. त्यांना सदर वाहनाचा संशय आल्यांने त्यांनी कारचा पाठलाग सुरु केला.

पोलीस हेडकॉन्स्टेबल जायभाये यांनी इंडिका कार निळवंडेचे पाटालगत अडवली. कारमधील तरुणांची चौकशी करत असतांना त्यांना कार मधील तरुणांबद्दल संशय आला. हल्ली कार मधील तरुणांकडे विचारपूस केले असता त्यातील तिघांनी आपली नावे ललित अनिल थोरात (वय २४ वर्षे रा. थोरात वस्ती, वडगावपान), किरण संजय काळे (वय १९, रा. माळेगाव हवेली), गणेश चंद्रभान गायकवाड (वय २६, रा. खांडगाव) असे असल्याचे चौकशीत जायभाये यांना सांगितले. जायभाये चौकशी करत असतांना या संशयितांचे दोन अन्य साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

जायभाये यांनी या प्रकाराची माहिती रॉबरी पेट्रोलींगचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सातपुते व पोलीस पथकाला दिली. होतं कातील कर्मचारी घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी संशयित कारची झडती घेतली असता त्यात एक देशी बनावटीचे गावठी पिस्तुल, चार जिवंत काडतुस, कोयता, मिरची पुड, चार मोबाईल आढळून आले. पथकाने या मुद्देमालासह इंडिका कार ताब्यात घेतली.

संशयित आरोपींना पथकाने पोलीस स्टेशनला आणत त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीतांनी संगनमतांने रस्त्यावर येणारे जाणारे गाड्या चालकांनी बाजुला लावल्यानंतर डिझेल चोरी करत असल्याबाबत कबुली दिली.

पोलीस हेड कॉन्स्टेबल संपत जायभाये यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,618
पोलीस संपत जायभाये
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.