Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अपर तहसील निर्मितीचा प्रस्ताव संगमनेरसोबत विश्वासघात… संगमनेरच्या स्वातंत्र्याशी खेळाल तर याद राखा… माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी कोणाला दिला इशारा!
राजकारण

अपर तहसील निर्मितीचा प्रस्ताव संगमनेरसोबत विश्वासघात… संगमनेरच्या स्वातंत्र्याशी खेळाल तर याद राखा… माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी कोणाला दिला इशारा!

अपर तहसील निर्मितीचा प्रस्ताव हा खोडसाळपणा आहे, तो वस्तुस्थितीला धरून नाही, ही बाब मी सरकार आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे, मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांना पत्र देऊन जनभावना कळवणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/01/2025Updated:30/01/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. ३० –

सत्तेचा वापर करून जनतेची सोय बघितली पाहिजे. मात्र काही लोक संगमनेर मोडण्याचे षडयंत्र करत आहे. आश्वी बुद्रुक अपर तहसील निर्मितीचा प्रस्ताव हा संगमनेर सोबत झालेला विश्वासघात आहे. संगमनेरच्या स्वातंत्र्याशी खेळाल तर याद राखा, असा सज्जड इशारा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.

संगमनेर तालुक्याचे विभाजन करत दोन तहसील कार्यालयांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या आश्वी बुद्रुक अपर तहसील कार्यालयाच्या कार्य कक्षेत संगमनेर शहरालगतची गावे राजकीय हेतूने जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यावरून संगमनेर तालुक्यात वाद निर्माण झाला आहे.

नव्याने आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अपर तहसील कार्यालयात समाविष्ट होणाऱ्या गावांच्या शिष्टमंडळाने कारखाना कार्यस्थळावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी बोलताना थोरात यांनी भर सभेत तहसीलदार यांच्या सहीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर झालेला अपर तहसील निर्मितीचा प्रस्तावच कार्यकर्त्यांसह सोबत असलेल्या जनतेला दाखविला.

कारखाना कार्यस्थळावर थोरात यांच्यासह संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्यासह विविध गावांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

थोरात म्हणाले, महसूल प्रशासन हे जनतेच्या सोयीसाठी असते. अपर तहसील निर्मितीला आमचा विरोध नाही, मात्र या तहसीलची निर्मिती करताना त्यामध्ये ज्या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. ती गावे संगमनेर शहराच्या लगत आहेत. संगमनेर खुर्द आणि बुद्रुक ह्या दोन गावांना आजवर प्रवरामारीने घट्ट पकडून ठेवले होते. पायी अंतरावर असलेले संगमनेरचे तहसील कार्यालय सोडून संगमनेर खुर्दच्या नागरिकांना तब्बल २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आश्वीला पाठवण्यामागचा प्रशासनाचा हेतू काय?

असे कितीतरी गावे आहेत ज्यांचा आश्वी बुद्रुक अपर तहसीलमध्ये करण्यात आलेला समावेश हा संशयास्पद आहे. नवीन अपर तहसील कार्यालय त्यांच्यासाठी गैरसोयीचे आहे, यातून संगमनेरची भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक रचनासुद्धा बिघडणार आहे. असे असताना कोणत्याही गावाला विश्वासात न घेता असा तहसील निर्मितीचा प्रस्ताव बनतोच कसा?

या पाठीमागे राजकीय डाव आहे, संगमनेरचे स्वातंत्र्य मोडीत काढण्याचा हा प्रयत्न आहे. एवढेच नाही तर संगमनेर शहराचे महत्व कमी करण्याची भूमिका देखील यामागे दिसते. संगमनेर तालुक्यासाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असेही थोरात म्हणाले.

हे राजकारण कोणालाही पटणार नाही… संगमनेरच्या मोडतोडीचा प्रस्ताव संगमनेरमधील माझ्या राजकीय विरोधकांनाही पटणार नाही. राजकारणात कदाचित आमच्या भूमिका वेगवेगळ्या आपल्या तरीही या अन्यायाविरोधात संगमनेरकर एकत्रित लढा उभारतील.

सरकार आणि प्रशासनाशी बोलणार… अपर तहसील निर्मितीचा प्रस्ताव हा खोडसाळपणा आहे, तो वस्तुस्थितीला धरून नाही, ही बाब मी सरकार आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे, मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांना पत्र देऊन जनभावना कळवणार आहे.

स्वतंत्र अपर तहसील निर्मिती हा संगमनेरला तोडण्याचा डाव आहे, त्यांच्या षडयंत्राची सुरुवात झाली आहे. यापुढे अशा अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागेल. मोठा संघर्ष करून संगमनेरसाठी आणलेले पाणी वाचविण्याची लढाई पुढील काळात लढावी लागेल. अनेक शासकीय कार्यालयाचे विभाजन करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, मात्र हे आम्ही सहन करणार नाही. संगमनेरच्या स्वातंत्र्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, अन्यथा मोठा उद्रेक होईल आणि तुम्हाला पळता भुई थोडी होईल. प्रशासनाने राजकीय दबावातून भूमिका घेऊ नये, आपण सदैव जनतेसोबत असले पाहिजे. प्रशासनाने राजकारणाचा भाग होता कामा नये. – बाळासाहेब थोरात, माजी मंत्री.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 691
आश्र्वी बुद्रुक अप्पर तहसील कार्यालय बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.