Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विरोधक जनतेत गैरसमज पसरवत आहे, जनतेच्या सूचना, मागणीचा आदर करूनच आश्वीच्या अपर तहसीलचा निर्णय – आमदार खताळ
राजकारण

विरोधक जनतेत गैरसमज पसरवत आहे, जनतेच्या सूचना, मागणीचा आदर करूनच आश्वीच्या अपर तहसीलचा निर्णय – आमदार खताळ

सध्या जिल्हा बँकेत भरती बाबत वाद सुरू आहे, आरक्षणाशिवाय भरती करू नये अशी मागणी होत आहे. मात्र यावर तालुक्यातील संचालक व उपाध्यक्ष आपली भूमिका का स्पष्ट करत नाही असा सवाल करून नेमके आत्ताच यावर आंदोलने का वाढली याचा शोध घेतला पाहिजे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. ३१ – 

संगमनेर तालुका हा मोठा असून शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार आश्वीला अपर तहसील कार्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र काही विरोधक जनतेत गैरसमज पसरवून राजकीय फायदा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. नागरिकांच्या सोयीसाठीच नविन बदल केला जात आहे, मात्र या संदर्भात अद्याप कुठलाच निर्णय झाला नाही. जनतेच्या सुचना व मागणीचा आदर करूनच अपर तहसीलचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली असल्याचे माध्यमातील वृत्तांत म्हटले आहे.

गेल्या काही दिवसापासून आश्वी बुद्रुक तहसील कार्यालयाबाबत जनतेत गैरसमज पसरविण्यात येत असून खुलासा करण्यासाठी गुरूवारी शासकिय विश्रामगृहामध्ये काही पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली.

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय सुरू करण्यासंदर्भात तहसीलदार धीरज मांजरे यांनी प्रस्ताव तयार केला होता. तो अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे, या संदर्भात जनतेची मते जाणून घेऊन त्यावर चर्चा होऊन निर्णय होणार आहे. मात्र तहसील कार्यालयातील एका अतिउत्साही कर्मचाऱ्याने हा प्रस्ताव विरोधकांना पाठवला. त्याचा शोध घेऊन कारवाई केली जाणार आहे. तहसीलदारांना तसे आदेश दिले आहेत, असे ते म्हणाले.

बाहेर आलेल्या पत्रावर जावक नंबर नाही, सही नाही, कच्चा मसुदा आहे. तोच अध्यादेश असल्याचे भासवून त्याचे राजकीय भांडवल करून तालुक्यात गैरसमज पसरविण्यात आला. हा निव्वळ प्रस्ताव आहे आदेश नाही. या संदर्भात या विचारणा होऊ लागल्याने खुलासा करणे गरजेचे होते. या तालुक्याचा मी लोकप्रतिनिधी आहे. या प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. जनतेची मते विचारात घेऊनच निर्णय घेतले जातात.

अपर तहसीलबाबत देखील चर्चा केली जाणार आहे. अपर तहसील कार्यालयाबाबत माहिती न घेता अर्धवट माहितीवर अपप्रचार केला आहे. अनेकांना पराभव पचवता आला नाही, अजूनही ते सावरू शकले नाही. यामुळे तालुक्यात संभ्रम निर्माण झाला आहे. चाळीस वर्षात विरोधकांनी फक्त राजकारण केले आहे.

जर अपर तहसील कार्यालय सोयीचे नसेल तर निर्णय होणार नाही. नागरिकांनी विरोधकांच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

आत्ताच आंदोलने का वाढली… सध्या जिल्हा बँकेत भरती बाबत वाद सुरू आहे, आरक्षणाशिवाय भरती करू नये अशी मागणी होत आहे. मात्र यावर तालुक्यातील संचालक व उपाध्यक्ष आपली भूमिका का स्पष्ट करत नाही असा सवाल करून नेमके आत्ताच यावर आंदोलने का वाढली याचा शोध घेतला पाहिजे. – अमोल खताळ, आमदार.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 901
अमोल खताळ आश्वी अप्पर तहसील कार्यालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

By Annant Ppangarkar11/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या…

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.