Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लेखक तांदळे यांनी रामाच्या काळात लिहिली ‘रावण राजा राक्षसांचा’ कादंबरी, मेधा महोत्सवाचे आनंद पर्व आज सुरू – माजी मंत्री थोरात
शिक्षण

लेखक तांदळे यांनी रामाच्या काळात लिहिली ‘रावण राजा राक्षसांचा’ कादंबरी, मेधा महोत्सवाचे आनंद पर्व आज सुरू – माजी मंत्री थोरात

काश्मीरपासून केरळपर्यंतचे विद्यार्थी येथे येत असे. भाषेची अडचण असताना देखील ते येथे शिकले. हे विद्यार्थी जीवनात 'आम्ही यशस्वी कसे झालो' हे तुम्हाला सांगणार आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर दि. २ फेब्रुवारी –
प्रख्यात लेखक असलेल्या शरद तांदळे यांनी आज रामाच्या काळात ‘रावण राजा राक्षसांचा’ कादंबरी लिहिली आहे. आगामी बळी या पुस्तकाचे ते लेखन करत असून ‘बळी’देखील क्रांतिकारक पुस्तक असेल असा विश्वास राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त करत मेधा महोत्सवाच्या आनंद पर्वाचे सुरुवात झाल्याची घोषणा केली.
संगमनेर मध्ये रविवारी अमृतवाहिनी कॉलेजच्या प्रांगणात बहुचर्चित ठरलेल्या मेधा महोत्सव २०२५ ला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते.
मेधा महोत्सवाचे पहिले पुष्प प्रख्यात लेखक, मेकॅनिकल इंजिनियर असलेले उद्योजक शरद तांदळे यांनी गुंफले. यावेळी थोरात यांच्यासह माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मेधा समन्वयक डॉ. व्यंकटेश आदींसह मान्यवर उपस्थित होते.
थोरात म्हणाले, २०१६ मध्ये सुरू झालेला मेधा महोत्सव सर्वांसाठी वर्षातील एक आनंद पर्वणी ठरत असतो. आज या आनंद पर्वाची सुरुवात होत असून या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये आपण या महोत्सवात राज्यातील पाच तरुण आमदारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. आजही त्या मुलाखती चर्चिल्या जातात. यावर्षी देखील असा उपक्रम करण्याचा प्रयत्न आहे.
स्नेहसंमेलना व्यतिरिक्त सर्व संस्थांच्या माध्यमातून मेधा महोत्सव घेण्याच्या उद्देशामागे भारतातील चांगलं बोलणारे वक्ते या व्यासपीठावर आणण्याचा मानस असतो. हे वक्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मेधा महोत्सव अकराला आला.
आज या महोत्सवात मेकॅनिकल इंजिनिअर असलेले शरद तांदळे आज आपल्याकडे आले आहे. ते अतिशय चांगले लेखक आहे. उद्योजक, मुलांना ते मार्गदर्शन करतात. तांदळे यांनी रामाच्या काळात रावण लिहिला आहे. बळी या पुस्तकाचे लिखाण ते सध्या करत आहे. ते एक क्रांतिकारक पुस्तक असेल. मेधाच्या पहिल्या पुष्पाची सुरुवात ते आज करत आहे. त्यांचं मार्गदर्शन तुमच्या जीवनासाठी मार्गदर्शकच नव्हे तर उपयोगी ठरणार आहे.
मेधा महोत्सवाच्या माध्यमातून आनंद घ्यायचा असतो. पुढे ती ऊर्जा अभ्यासासाठी वापरायची असते. या महोत्सवाच्या माध्यमातून पुढील आयुष्यभर आठवणीत राहणाऱ्या अनेक गोष्टी घडतात. एक हजार माजी विद्यार्थी या निमित्ताने येथे येत आहे. काही माजी विद्यार्थी राजकारणात असून मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहत आहे. तर काहींनी परदेशात मोठ्या इंडस्ट्रीज उभ्या केल्या आहे. काश्मीरपासून केरळपर्यंतचे विद्यार्थी येथे येत असे. भाषेची अडचण असताना देखील ते येथे शिकले. हे विद्यार्थी जीवनात ‘आम्ही यशस्वी कसे झालो’ हे तुम्हाला सांगणार आहे, असे थोरात म्हणाले.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 374
बाळासाहेब थोरात मेधा महोत्सव शरद तांदळे सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar09/10/20260

आजचे राशीभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला रासेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची…

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.