Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

निळवंडेच्या पाण्यामुळे पंचक्रोशीतील शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार: पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील चिंचोली गुरव उपसा सिंचन प्रकल्पासाठी पाच कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

23/09/2026

प्रांताधिकारी कार्यालयात गोंधळ; गुन्हा दाखल

23/09/2026

आश्वी परिसरात अवैध धंद्यांचा धुमाकूळ; पोलिसांच्या दुर्लक्षावर ग्रामस्थांचा संताप, कारवाईकडे लक्ष

23/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पालकमंत्री साहेब राजकारण करा पण संगमनेरकरांच्या अस्मितेशी खेळू नका, छत्रपती आमची अस्मिता… माजी शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी
राजकारण

पालकमंत्री साहेब राजकारण करा पण संगमनेरकरांच्या अस्मितेशी खेळू नका, छत्रपती आमची अस्मिता… माजी शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी

राजकारण करा पण संगमनेरकराच्या अस्मितेशी खेळू नका. तुम्हाला नेमका संगमनेरकरांवर कोणता राग आहे हे समजायला मार्ग नाही. तुमची वैयक्तिक कोणाशी दुश्मनी असेल तर खुशाल राग काढा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/02/2025Updated:05/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. ०४ फेब्रुवारी – 

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा फसवी ठरली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा निधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पालकमंत्र्यांनी संगमनेरकरांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे बोलले जात आहे. यावरून पालकमंत्री साहेब राजकारण करा पण संगमनेर तालुक्याच्या अस्मितेशी खेळू नका, छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आहे. अशा शब्दात शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी आपली नाराजी जाहीर केली आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी जाहीर केलेल्या निधीचे काय झाले, तो निधी अद्याप का मिळाला नाही अशी विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारचा निधी या समितीच्या माध्यमातून देता येत नसल्याचे स्पष्ट करत या संदर्भात सरकारचे मार्गदर्शन मागविल्याचे म्हटले होते. त्यामुळे अश्वारूढ पुतळ्यासाठी जिल्हा विकास निधीच्या माध्यमातून एक कोटी रुपये देण्याची पालकमंत्र्यांची घोषणा फसवी ठरली आहे.

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी शिवसेनेने सर्वप्रथम केल्याचे निदर्शनास आणून देत अमर कतारी यांनी यासाठी शिवसेना व शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून अकरा लाख रुपयांचा निधी देखील देण्याची घोषणा करत नगर परिषदेने यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून सरकारकडे यासाठीच्या प्रस्ताव देखील पाठविला होता. आमदार सत्यजित तांबे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील यासाठी पाठपुरावा केला.

हा पाठपुरावा सुरू असतानाच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरच्या बसस्थानक प्रवेशद्वाराबाहेर बसविल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र तो निधी आता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी आपली नाराजी स्पष्ट केली आहे.

कतारी म्हणाले, पालकमंत्री साहेब, राजकारण करा पण संगमनेरकराच्या अस्मितेशी खेळू नका. तुम्हाला नेमका संगमनेरकरांवर कोणता राग आहे हे समजायला मार्ग नाही. तुमची वैयक्तिक कोणाशी दुश्मनी असेल तर खुशाल राग काढा, पण विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आपण संगमनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी एक कोटी रुपये निधी देण्याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जी घोषणा केली होती, ती खोटी असल्याचे समजले. खूप वाईट वाटले. राजकारण झालं… छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा खोटी ठरली. शिवभक्तांना अजून किती वर्ष वाट पहावी लागेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कधी अश्वारूढ पुतळा होईल? राजकारण जरूर करा पण छत्रपतीच्या बाबतीत नाही. अस म्हटलं आहे. कतारी यांनी आपली नाराजी समाज माध्यमातून जाहीर केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 19,368
अमर कतारी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा निधी राधाकृष्ण विखे पाटील सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

निळवंडेच्या पाण्यामुळे पंचक्रोशीतील शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार: पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील चिंचोली गुरव उपसा सिंचन प्रकल्पासाठी पाच कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

23/09/2026

संगमनेर तालुक्यात १०२ कोटींच्या विकासकामांचा धडाका; उद्या पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

22/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

निळवंडेच्या पाण्यामुळे पंचक्रोशीतील शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार: पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील चिंचोली गुरव उपसा सिंचन प्रकल्पासाठी पाच कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

By Annant Ppangarkar23/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- निळवंडे धरण लाभक्षेत्राला पाण्याचा प्रत्यक्ष लाभ देण्याच्या पार्श्वभूमीवर चिंचोली गुरव व…

प्रांताधिकारी कार्यालयात गोंधळ; गुन्हा दाखल

23/09/2026

आश्वी परिसरात अवैध धंद्यांचा धुमाकूळ; पोलिसांच्या दुर्लक्षावर ग्रामस्थांचा संताप, कारवाईकडे लक्ष

23/09/2026

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.