Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यातील या देवस्थानांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे आमदार सत्यजित तांबे यांची मागणी
धार्मिक

संगमनेर तालुक्यातील या देवस्थानांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे आमदार सत्यजित तांबे यांची मागणी

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका अनेक मोठ्या विकास कामांसाठी, खांडेश्वर, निझरणेश्वर, दुधेश्वर, रामेश्वर, श्रीदत्त अकलापूर, बाळेश्वर आदी देवस्थानचा पर्यटन विकास निधीतून क वर्ग तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून विकास झाला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. ०५ फेब्रुवारी –

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील देवस्थानचा पर्यटन निधी मधून मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. यातील वेल्हाळे, मालदाड, खळी, आश्वी येथील देवस्थान क वर्ग तीर्थस्थानाचा दर्जा देण्याची मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी अहिल्या नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

वेल्हाळे येथील श्रीक्षेत्र हरीबाबा देवस्थान, मालदाड येथील चैतन्य मच्छिंद्रनाथ देवस्थान, आश्वी बुद्रुक येथील चैतन्य कानिफनाथ देवस्थान, खळी येथील खंडोबा महाराज देवस्थान आणि निळवंडे येथील दत्त महाराज देवस्थान या तीर्थस्थानांचा यात समावेश आहे.

या संदर्भात आमदार तांबे यांनी म्हटले आहे की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका अनेक मोठ्या विकास कामांसाठी, खांडेश्वर, निझरणेश्वर, दुधेश्वर, रामेश्वर, श्रीदत्त अकलापूर, बाळेश्वर आदी देवस्थानचा पर्यटन विकास निधीतून क वर्ग तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून विकास झाला आहे.

तालुक्यातून देवस्थानांना तालुक्यासह जिल्हाभरातून अनेक भाविक सातत्याने भेट देत असतात. चांगल्या सुविधांमुळे भाविकांची तेथे सोय होत आहे. याचप्रमाणे सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालदाड येथील श्री क्षेत्र चैतन्य मच्छिंद्रनाथ मठ देवस्थान, आश्वी बुद्रुक येथील श्री चैतन्य महाराज देवस्थान, खळी येथील खंडोबा महाराज देवस्थान, निळवंडे येथील दत्त महाराज देवस्थान या चार तीर्थक्षेत्रांना क दर्जा मंजूर करावा.

निळवंडे येथील डोंगरावर असलेल्या देवस्थान दत्त महाराज चैतन्य कानिफनाथ क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा योजनेतून सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

याचप्रमाणे वेल्हाळे येथील श्री क्षेत्र हरीबाबा देवस्थान हे प्रसिद्ध असून या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. येथे भौतिक सुविधांचा अभाव असल्याने अनेक भाविकांची गैरसोय होते. तसेच मंदिर परिसर विकसित करणे अत्यंत गरजेचे असल्याने या तीर्थक्षेत्राला क वर्ग देऊन मंदिर परिसराचे सुशोभीकरण व भाविकांसाठी भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी क वर्ग तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत निधी मिळावा व या परिसराचे सुशोभीकरण व विकास करावा.

याचबरोबर मालदाड येथील चैतन्य मच्छिंद्रनाथ मठ देवस्थान, आश्वी बुद्रुक येथील चैतन्य कानिफनाथ महाराज देवस्थान,खळी येथील खंडोबा महाराज देवस्थान व निळवंडे येथील दत्त महाराज देवस्थाना क दर्जा मिळावा व यातून सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी आहे.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली वेल्हाळे व परिसरामध्ये अनेक विकास कामांच्या योजना राबवल्या असून पुढील आठवड्यामध्ये होत असलेल्या हरीबाबा यात्रेच्या निमित्ताने हरिबाबा मंदिराचे सुशोभीकरण व क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा बाबतची केलेल्या मागणीबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,349
तीर्थक्षेत्र दर्जा सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

नाशिक-पुणे रेल्वे सिन्नर-संगमनेर मार्गानेच झाली पाहिजे! आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारला थेट इशारा, अन्यथा आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रोखणार

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar09/10/20260

आजचे राशीभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला रासेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची…

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.