Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विजयानंतरच्या सुतकाचा अन्वयार्थ…
विश्लेषण

विजयानंतरच्या सुतकाचा अन्वयार्थ…

लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/02/2025No Comments6 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्याच्या मुहुर्तावर पक्ष प्रमुख राज यांनी राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाचा अन्वयार्थ सांगून टाकला. राज हे हजरजबाबी असल्याने त्यांच्या म्हणण्याला जरूर अर्थ असतो. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात निर्माण झालेल्या सन्नाट्याने निकालाचं सार सांगून टाकलं. निकाल किती योग्य आणि किती अयोग्य, याचे पाढे वाचले गेले. ज्यांना अपेक्षा नव्हती ते केवळ निवडूनच आले असं नाही तर त्यांना मिळालेली मतं ही अनपेक्षितच होती. अशा विजयाचा सोहळा कोणी साजरा करत नसतो. यामुळेच प्रचंड विजय होऊनही भाजप आणि त्यांच्या युती सरकारमधल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मौनात सोहळा साजरा केला. यापूर्वी असं कधी झालं नाही. अगदी एक दोन अतिरिक्त जागा मिळाल्या तरी आनंदाला पारावार नसायचा. इतक्याशा फरकाने विजय मिळाला की त्यावर कितीतरी आनंद साजरा व्हायचा. इथे तर सारं शतकापार जाऊनही विजयी झालेल्यांच्या चेहर्‍यावर बारा दिवसांचं सुतक होतं. हे सुतक लक्षात घेता ही निवडणूक बदमाशी करून, मतांच्या चोर्‍या करून, मतदार यादीत घोळ करून लढवली गेली असाच अर्थ निघतो. राज यांच्या भाषणाचा रोख तोच होता. राज यांनी केवळ आरोप करायचे म्हणून केले नाहीत. 

त्यांनी या पृष्ठ्यर्थ असंख्य उदाहरणं पुढे ठेवली. राजू पाटील यांच्या गावात त्यांना न पडलेलं एकही मत, संगमनेरमध्ये कधीही ५० हजारांहून अधिक मतांनी विजयी झालेल्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव अशा अनेक उदाहरणांची जंत्री उपस्थितांपुढे ठेवली. आणि निवडणुकीच्या निकालानंतरच्या सन्नाट्याला हात घातला. अशा निवडणुका होणार असतील, तर त्या घ्यायच्याच कशाला, हा राज यांचा सवाल सडेतोडच नव्हे तर लोकशाही मानणार्‍या राज्यातील जनतेच्या काळजाला हात घालणारा आहे.
राज यांनी म्हटलं ते खरंच घडलय का? निवडणुकीच्या निकालानंतरचा सन्नाटा तर राज्यातल्या जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिलाय. भाजपप्रणित युती सरकार राज्यात पुन्हा निवडून येऊ शकत नाही, हे सर्वदूर अधोरेखित होतं. असं असताना ते सरकार निवडून येणं, न पटणारंच होतं. ज्यांचा एकच खासदार निवडून आला त्यांचे ४० आमदार निवडून येणं या गोष्टी कल्पनेबाहेरीलच होत्या. भाजपला शंभरी गाठता येणार नाही, असं दिसत असताना त्यांचे १३७ आमदार निवडून येणं, या सार्‍या शक्यतेबाहेरील गोष्टी होत्या.
हे का आणि कसं घडलं याचं उत्तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आणि मलिक्कार्जून खरगे आणि संजय राऊत यांनी राज्यसभेत दिलं. त्यानंतर जनतेच्या प्लॅटफॉर्मवरही निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पोलखोल केला. याचं आम्ही उत्तर देऊ असं ट्विट आयोगाने केलं असलं तरी त्यावर विश्‍वास ठेवायला जागा नाही. आयोग भाजपसाठी ज्या प्रकारे राबत आहे, ते लक्षात घेता आयोगाकडून राजकीय पक्षांच्या आणि मतदारांच्याही काही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. मतदान झालेल्या शेवटच्या तासात ७६ लाख मतदार आले कुठून याचा ठावठिकाणा आयोगाकडे नाही. या मतदारांची झालेली नोंद, त्यांच्या राहण्याचे पत्ते यासाठीचे पुरावे याची कुठलीही माहिती आयोगाकडे नाही, असं उत्तर माहितीच्या अधिकारातील एका उत्तरात आयोगाने देऊन टाकलं आहे. लोकसभा निवडणुकीतील मतदार यादी आणि विधानसभेतील मतदार याद्या उपलब्ध करून देण्याची मागणीही आयोग मानायला तयार नाही. आणि आयोगावर याचं बंधन नाही, असं केंद्र सरकारने अधिसूचना काढून ठरवून टाकल्याने या ७६ लाख मतदारांच्या सत्यतेविषयी असलेला संशय अधिक गढद होणं स्वाभाविकच होय.
चार महिन्यांपूर्वी राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्राने भाजपकडे फिरवलेली पाठ सार्‍या देशाने पाहिली. ज्या महाराष्ट्रावर भाजपची मदार होती त्या राज्यात ४८ पैकी ४० जागा मिळवण्याच्या बाता मारल्या जात होत्या. पण मतदारांनी हा आकडा १५ पर्यंतही नेऊ दिला नाही. यावरून येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काय होणार, याची गणितं स्पष्ट दिसत होती. इव्हीएम मशीनवर एकीकडे अविश्‍वास असताना दुसरीकडे मतदार यादीतील वाढत्या टक्केवारीचा पध्दतशीर वापर करून निवडणुकीत यश मिळवल्याचा आक्षेप घेतला जातो आहे. हा आक्षेप अगदीच खोटा आहे असं मुळीच नाही.
मनसेने मुंबईतील दहिसर मतदारसंघात राजेश येरूणकर यांना उमेदवारी दिली होती. ते ज्या मतदान केंद्राच्या परिसरात राहतात तिथे त्यांना केवळ दोनच मतं पडू शकतात? एकतर त्यांच्या पत्नीने आणि आईनेही येरूणकरारंना मतदान केलं नाही, असा याचा अर्थ निघतो. हे किती खरं आहे? आक्षेप नोंदवायला गेलेल्या कार्यकर्त्यांना अटकेची धमकी दिली गेली. धुळे ग्रामीण येथे काँग्रेस पक्षाचे कुणाल पाटील हे उमेदवार होते. या मतदारसंघातील अवधान गावात कुणाल पाटील यांना एकही मत मिळू शकलं नाही. वर्चस्व असलेल्या गावात शुन्य मतं पडणार असतील, तर इतर ठिकाणी दावे कसले करावेत, असा प्रश्‍न कुणाल पाटील यांचा आहे, जो अगदी योग्यच म्हटला पाहिजे.
ज्या परळीत सध्या धनंजय मुंडे यांच्या नावाने शंख फुंकले जात आहेत त्या परळीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिथले कार्यकर्ते राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली होती. लिमगाव हे राजेसाहेब यांचं वर्चस्व असलेल्या गावात त्यांना केवळ १९ मतं पडावीत? आयोगाकडे तक्रार केली. पण साधं उत्तर देण्याचं दायित्व आयोगाच्या संबंधितांनी दाखवलं नाही. लोकसभा निवडणुकीत चांगल्या मतांनी विजयी झालेले आर्वीचे खासदार अमर काळे यांच्या पत्नी ज्या वाठोडा गावात राहतात हे गाव निवडणुकीपूर्वी काँग्रेसवासी झालं होतं. मात्र मतदानातील निकाल मात्र उलटाच लागला. इथे दिवसभर वापरात आलेल्या इव्हीएम मशीनचं चार्जींग ९० टक्के कसं काय दाखवू शकतं, हा आक्षेपही आयोगाने विचारात घेतला नाही.
या निवडणुकीत अखेरच्या तासात ७६ लाख मतदान झालं. हे मतदार कोण होते, याविषयीचं भाष्य करताना राहुल गांधी यांनी शिर्डीतील ज्या शाळेचा उल्लेख केला ती शाळा लोणी येथे आहे. या सरकारमधले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ही संस्था असल्याने तिथे बोगस नावांचा वापर करून मतदान करण्यात आल्याचं प्रभावती घोगरे यांनी जाहीरपणे सांगितलं. मतदान सुरू असताना घोगरे यांना होत असलेल्या मतदानाची माहिती मिळाली आणि त्या लागलीच संबंधित शाळेवर रवाना झाल्या. मतदान करणार्‍या काहींची विचारपूस करता मतदान करणारे विद्यार्थी हे या मतदासंघातील नसल्याचं स्पष्ट झालं. खोदून विचारल्यावर त्या विद्यार्थीनीने आपण धुळ्याची असल्याचं सांगून पळ काढला. विखेंच्या प्रवरा येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचं तिने नमूद केलं. अधिकची चौकशी केल्यावर या विद्यार्थीनीने मतदान केंद्रातून काढता पाय घेतला.
सोलापूर माळशिरसच्या मारकडवाडी या गावातील विजयी उमेदवार असलेल्या उत्तमराव जानकर यांना गावात एकही मत पडलं नाही. यावर स्वत: जानकर यांनी आक्षेप घेतला पण आयोगाने काहीही उत्तर दिलं नाही. यामुळे गावाने मतपत्रिकेवर प्रतिकात्मक मतदान जाहीर केलं. तेव्हा आयोगाने त्याला आक्षेप घेतला. जमावबंदी लादली. कर नाही तर डर कशाला? या आक्षेपाला अपेक्षेप्रमाणे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असणं, हे ओघाने आलंच. त्यांनी राहुल गांधी यांना पराभवाचं आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. दिल्लीतल्या पराभवाच्या भीतीने हा आक्षेप घेतला जात असल्याचं सांगणार्‍या फडणवीस यांनी लोकसभेत झालेल्या दारूण पराभवाचं आत्मपरीक्षण काय केलं, हे कधी सांगितलंच नाही.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही राहुल यांचे आक्षेप मान्य असण्याचं कारण नाही. त्यांनी उध्दव ठाकरेंना याआधीच बुध्दू ठरवून टाकलं आहे. आता राहुल यांच्यावरही त्यांनी शरसंघान साधलं आहे. आनंद परांजपे यांची अवस्था इकडे आड.. अशी आहे. त्यांनाही आक्षेप मान्य नाही. सत्तेची चाकरी करायची तर अशी भूमिका ही घ्यावीच लाजणार. आयोग याविषयी एक शब्द का बोलत नाही? ज्या निवडणूक प्रक्रियेवर शेकडोंच्या संख्येने तक्रारी आल्या त्या तक्रारींची सोडवणूक न करणार्‍या निवडणूक आयोगाचे राज्यातील प्रमुख एस. चोकालिंगम यांचा दिल्लीत बोलवून सत्कार केला जात असेल तर मतदानाच्या प्रक्रियेवरील आरोपांचं निरसन होईल, अशा भ्रमात कोणी राहण्याचं कारण नाही.
(लेखकाशी संपर्क – ८१६९१३५२५३)
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 459
निवडणूक आयोग प्रवीण पुरो बाळासाहेब थोरात राज ठाकरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.