Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वारकरी धर्माने मराठी मनाची मशागत केली – रंगनाथ पठारे
धार्मिक

वारकरी धर्माने मराठी मनाची मशागत केली – रंगनाथ पठारे

पंढरपूर येथील मंदिर प्रवेशाचा दाखला देत संत नामदेव महाराजांच्या कार्याबद्दल राजाभाऊ अवसक यांनी माहिती देत प्रास्ताविक केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, दि. ११ फेब्रुवारी –
वारकरी परंपरेचे सामाजिक समतेसाठी मोठे योगदान राहिले आहे. वारकरी संतांचे कार्य सामाजिक जडणघडणीसाठी ऐतिहासिक ठरले आहे. खऱ्या अर्थाने वारकरी धर्माने मराठी मनाची मशागत केली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले. साहित्यिक पठारे यांच्या हस्ते ह. भ. प. ज्ञानेश्वर बंडगर लिखित ‘होय होय वारकरी’, व डॉ. श्रीरंग गायकवाड यांच्या संत एकनाथ महाराजांवरील विशेष अंकाचा प्रकाशन सोहळा रविवारी पार पडला.
संगमनेर तालुका वारकरी संघटना, श्री विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाज आणि सांदिपनी गुरुकुल, घुलेवाडी यांच्यावतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाजाच्या जनसखा भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. दत्तात्रय महाराज भोर होते.
यावेळी पंढरपूरच्या संत विचारपिठाचे संस्थापक राजाभाऊ अवसक, ह.भ.प. सुदाम महाराज कोकणे, ह.भ.प. राम महाराज पवळ, सिताराम राऊत उपस्थित होते.
साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी यावेळी प्रकाशित करण्यात आलेल्या अंकांचे कौतुक केले. वारकरी संप्रदायाचा समाज मनावर झालेला परिणाम आणि त्यांचे योगदान याविषयी त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पंढरपूर येथील मंदिर प्रवेशाचा दाखला देत संत नामदेव महाराजांच्या कार्याबद्दल राजाभाऊ अवसक यांनी माहिती देत प्रास्ताविक केले. यावेळी डाॅ. श्रीरंग गायकवाड, ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर आणि ह.भ.प. सुदाम कोकणे यांनीही मनोगत व्यक्त केलं. ह. भ. प. बाळकृष्ण करपे यांनी आभार मानले. तर संजय जेडगुले यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमादरम्यान एप्रिल २०२५ मध्ये होणाऱ्या श्री विठ्ठल मंदिराव नामदेव शिंपी समाज मंदिराच्या पुनर्स्थापनेच्या सोहळ्याची उद्घोषणा यावेळी करण्यात आली. कार्यक्रमासाठी राजेंद्र शित्रे, रजत अवसक, शशिकांत शेजवळ, प्रसाद अवसक यांनी मेहनत घेतली.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 644
पुस्तक प्रकाशन रंगनाथ पठारे राजाभाऊ आवसक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली…

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.