Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्याचे वादग्रस्त मंत्री नितेश राणे यांच्या आगाऊपणाची हद्द, ‘महाविकास आघाडीच्या सरपंचाला एक पैचा निधी…’
राजकारण

राज्याचे वादग्रस्त मंत्री नितेश राणे यांच्या आगाऊपणाची हद्द, ‘महाविकास आघाडीच्या सरपंचाला एक पैचा निधी…’

नितेश राणे म्हणाले, “जिल्हा नियोजन समिती किंवा सरकारचा कुठलाही निधी असेल, तो फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना मिळेल. बाकी कुणालाही मिळणार नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / प्रवीण पुरो

मुंबई – ठाकरे किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, तिथे एक रूपयांचा सुद्धा निधी देणार नाही. निधी पाहिजे, तर भाजपमध्ये प्रवेश करा. भरपूर निधी मिळेल. अन्यथा विकास होणार नाही, असा दम आणि आगाऊपणाची भाषा राज्याचे वादग्रस्त मंत्री नितेश राणे यांनी वापरली आहे.

नितेश राणे यांच्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. देशात लोकशाही शिल्लक आहे का? असा सवाल शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांच्या विधानावरून उपस्थित केला आहे.

भाजपच्या ओरोस मंडलचा कार्यकर्ता मेळावा ओरोस येथे भाजपचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा भाजप अध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपचे नेते अतुल काळसेकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा भाजप महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, अशोक सावंत, रणजित देसाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

नितेश राणे म्हणाले, “जिल्हा नियोजन समिती किंवा सरकारचा कुठलाही निधी असेल, तो फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना मिळेल. बाकी कुणालाही मिळणार नाही. मी माझ्या लोकांना ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सरपंच असलेल्या गावांची यादी काढण्यासाठी सांगितलं आहे. ज्या गावांत ठाकरे किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, तिथे एक रूपयांचा सुद्धा निधी देणार नाही.

गावाचा विकास करायचा असेल, तर भाजपमध्ये प्रवेश करा. भरपूर निधी मिळेल. अन्यथा विकास होणार नाही, असा अजब सल्ला त्यांनी उपस्थिताना दिला.

येणार्‍या निवडणुकांमध्ये शतप्रतिशत भाजप हे उद्दिष्ट कायम असायला हवं, त्यासाठी मैत्रीपूर्ण लढत झाली तरी चालेल, कारण निवडून येणारे महायुतीचेच असणार आहेत. चुकून विरोधी पक्षाचं कुणी आलेच तर त्यांनाही आतमध्ये घेऊ. भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांना मदत करू नये, असा दम त्यांनी कार्यकर्त्यांना भरला.

नितेश राणे यांच्या विधानावरून नवा वाद उफाळला आहे. सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’ अकाउंटवर ट्विट केले आहे. विश्वगुरू होण्याची भाषा करणारे पंतप्रधान आणि ऑपरेशन ब्लॅकमेलर राबवणाऱ्या पक्षाने हा व्हिडिओ बघितल्यानंतरही या देशात लोकशाही व्यवस्था शिल्लक आहे, यावर भाषणे द्यायला हवीत काय? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 533
ओरोस मेळावा नितेश राणे निधी सुषमा अंधारे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.