Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्णयाने साऱ्यांच्या नजरा एकवटल्या
राजकारण

वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्णयाने साऱ्यांच्या नजरा एकवटल्या

भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ५७ जागा लढवल्या आणि त्यापैकी ४१ जागा जिंकल्यात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांनी धनंजय मुंडेंना कोअर ग्रुपमधील सदस्यत्व देऊन त्यांना एक प्रकारे पाठबळ दिल्याचं बोललं जातंय.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीत स्थान दिल्याने साऱ्यांच्या नजरा अजित पवारांकडे एकवटल्या आहेत.

देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या सलगीवरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारासह विरोधकांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा वारंवार केली जात आहे.

इतकं असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना अभय देण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्याने स्थापन झालेल्या ‘कोअर ग्रुप’मध्ये मुंडेना सदस्य करण्यात आलंय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी संघटना मजबूत करण्याबरोबरच धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि कल्याणकारी योजना सुरू करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांचा समावेश असलेला ‘कोअर ग्रुप’ तयार केला आहे. धनंजय मुंडेंबरोबरच अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ हे भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडी महायुतीच्या घटक पक्षाचे सदस्य आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या ग्रुपचा मुख्य उद्देश पक्षाची पुनर्बांधणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नियोजन करणे आहे.

धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ हे भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत, तर भुजबळ आणि वळसे पाटील हे मागील एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात होते. जुलै २०२३ मध्ये शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडणारे अजित पवार यांना आमदारांच्या संख्याबळाच्या आधारावर नंतर पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह मिळाले.

भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ५७ जागा लढवल्या आणि त्यापैकी ४१ जागा जिंकल्यात.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांनी धनंजय मुंडेंना कोअर ग्रुपमधील सदस्यत्व देऊन त्यांना एक प्रकारे पाठबळ दिल्याचं बोललं जातंय. महाविकास आघाडीकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच मुंडेंना कोअर ग्रुपमध्ये स्थान दिल्याने अजितदादांचा मुंडेंवर अजूनही विश्वास कायम असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित प्रकरणात मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी धनंजय मुंडे यांच्यावर महायुतीच्या आघाडी सरकारमध्ये कृषी खात्याचा कारभार सांभाळत असताना ८८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता, त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले होते. अन्न आणि नागरी पुरवठा खाते सांभाळणाऱ्या धनंजय मुंडेंनी अंजली दमानियांचे आरोप निराधार असल्याचाही खुलासा केला होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 513
अजित पवार धनंजय मुंडे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.