Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दादागिरी आणि दहशतीचा विजय झाला, महाराज सकल मराठा समाज या राजकीय गुंडगिरीसमोर हरला आहे, अशी पोस्ट व्हायरल करत सकल मराठा समाजाचा शिवजयंती उत्सव रद्द; दहा वर्षांची परंपरा खंडित… नेमकं काय घडलं!
राजकारण

दादागिरी आणि दहशतीचा विजय झाला, महाराज सकल मराठा समाज या राजकीय गुंडगिरीसमोर हरला आहे, अशी पोस्ट व्हायरल करत सकल मराठा समाजाचा शिवजयंती उत्सव रद्द; दहा वर्षांची परंपरा खंडित… नेमकं काय घडलं!

दरम्यान या संदर्भात माहिती घेण्यासाठी सकल मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता त्यांनी झालेल्या घटनेला दुजोरा दिला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/02/2025Updated:19/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १८ फेब्रुवारी – 

सकल मराठा समाजाच्यावतीन गेल्या दहा वर्षापासून १९ फेब्रुवारीला संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारापाशी शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. यावर्षी मात्र या उत्सवाला गालबोट लागले आहे. काही मंडळींनी दादागिरी करून हा जयंती उत्सव रद्द करण्यास सकल मराठा समाजाला भाग पाडल्याची माहिती समोर येत आहे.

शिवजयंती उत्सवावरून संगमनेरमध्ये राजकारण तापलेले आहे. महायुतीच्यावतीने यावर्षी शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हा उत्सव संध्याकाळी मिरवणुकीने साजरा होणार होता. दरम्यान सकाळच्या सत्रात सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बसस्थानकाच्या दरम्यान शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार होता. 

यामध्ये सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, मॅरेथॉन, मर्दानी खेळ, लाईट शो, आरोग्य शिबिर, संध्याकाळी आतिषबाजी व पोवाड्याचा कार्यक्रम केला जाणार होता. त्या कार्यक्रमाची तयारी सुरू झालेली होती. 

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारीला विद्यमान लोकप्रतिनिधी अमोल खताळ यांनी त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून बस स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या परिसरातच मॅरेथॉन आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन केल्याची पोस्ट केली. तर नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री सकल मराठा समाजाच्यावतीने बसस्थानक परिसरात कमान उभारण्याचे काम सुरू होते, यावेळी महायुतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी येऊन तुम्ही वेगळी शिवजयंती साजरी करू नका, महायुतीत सहभागी व्हा, असे सांगितले. त्यावर सकल मराठा समाजाने आम्ही अराजकीय जयंती साजरी करतो, याला मोठी परंपरा असल्याचे सांगितले. 

दरम्यान रात्री बस स्थानकावर आलेले शिवसेना आमदार अमोल खताळ संबंधितांशी चर्चा करत असताना यावेळी काही कार्यकर्त्यांनी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना दादागिरी करत जयंती साजरी करू नका असे सुनावले. यावरून बसस्थानकावर रात्री मोठा राडा झाल्याची चर्चा असून या दादागिरीचा निषेध म्हणून सकल मराठा समाजाने जयंती साजरी न करण्याचा निर्णय घेतला. 

सकल मराठा समाजाच्यावतीने सोशल मीडियावर महाराज आम्हाला माफ करा दहशत आणि दादागिरीमुळे आम्ही तुमची जयंती साजरी करू शकलो नाही, अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल करून झालेल्या घटनेचा निषेध नोंदविला जात आहे. दरम्यान या संदर्भात माहिती घेण्यासाठी सकल मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता त्यांनी झालेल्या घटनेला दुजोरा दिला आहे.

काय आहे व्हायरल पोस्ट…

महाराज आम्हाला माफ करा…. महाराज आम्हाला माफ करा… गेली १० वर्षे सकल मराठा समाज एकत्रित येऊन संगमनेर बस स्थानकासमोर शिवजयंती साजरा करायचा. या जन्मोत्सवात आम्ही कधीही राजकारण आणले नाही… महाराज यंदा मात्र राजकारण जिंकले, दादागिरी आणि दहशतीचा विजय झाला. महाराज, सकल मराठा समाज या राजकीय गुंडगिरी समोर हरला आहे. आम्हाला माफ करा महाराज… (शिवजयंती निमित्ताने सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित मॅरेथॉन, लाईट शो, अभिवादन, मर्दानी खेळ, आरोग्य शिबिर, आतिशबाजी आणि पोवाडा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे.) आपला : सकल मराठा समाज.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,672
अमोल खताळ वाद शिवजयंती उत्सव सकल मराठा समाज
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, ग्रामीण भागातील अर्थकारणाचा…

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.