Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोकनेते बाळासाहेब थोरात यांना सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार जाहीर… राजकीय, सामाजिक, सहकार व शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सांगली येथे होणार सन्मान
यश / निवड / पुरस्कार

लोकनेते बाळासाहेब थोरात यांना सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार जाहीर… राजकीय, सामाजिक, सहकार व शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सांगली येथे होणार सन्मान

रविवारी (२ मार्च) सकाळी ११ वाजता भावे नाट्यमंदिर, सांगली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार थोरात यांना प्रदान केला जाणार असल्याचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार म्हणून राज्यात ओळख असलेले सुसंस्कृत नेतृत्व बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सहकार, शिक्षण व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दलचा यावर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार सहकार चळवळीतील अग्रणी नेते स्व. गुलाबराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्यावतीने महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, सहकार, कला, साहित्य या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याना सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार देण्यात येत असतो.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व असलेले लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य मंत्रिमंडळातून केलेल्या पायाभूत व ऐतिहासिक कामांमुळे कृषी, महसूल, शिक्षण, जलसंधारण या महत्त्वाच्या खात्यांना नवी भरारी मिळाली. याचबरोबर काँग्रेसचे प्रांताध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेते म्हणून सक्षमपणे जबाबदारी पार पाडली आहे. राष्ट्रीय कमिटीचे सदस्य म्हणूनही थोरात काम करत आहेत.

सहकारातून संगमनेर तालुका समृद्ध बनवताना सर्व सहकारी संस्था या देशाला दिशादर्शक ठरल्या आहेत. तर पायाभूत विकास कामांमुळे संगमनेर शहर व तालुका अग्रगण्य आहे. याचबरोबर निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिले आहे.

रविवारी (२ मार्च) सकाळी ११ वाजता भावे नाट्यमंदिर, सांगली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार थोरात यांना प्रदान केला जाणार असल्याचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे

यापूर्वीही लोकनेते थोरात यांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू, यशवंतराव चव्हाण पुरस्कार यांसह विविध पुरस्कार मिळाले आहेत. तर सहकार तीर्थ गुलाबराव पाटील यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पहिल्या पुरस्काराने याआधी अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांना सन्मानित करण्यात आले होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,117
पुरस्कार बाळासाहेब थोरात सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.