Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पिस्तूलचा धाक दाखवत चालकाला बेशुद्ध करत सहा लाखाची शेती औषधे पळविली, फिर्यादी पिकअप चालकच निघाला आरोपी, चौघांच्या टोळीचा घारगाव पोलिसांकडून पर्दाफाश; मुद्देमालासह आरोपींची रवानगी तुरुंगात
गुन्हेगारी

पिस्तूलचा धाक दाखवत चालकाला बेशुद्ध करत सहा लाखाची शेती औषधे पळविली, फिर्यादी पिकअप चालकच निघाला आरोपी, चौघांच्या टोळीचा घारगाव पोलिसांकडून पर्दाफाश; मुद्देमालासह आरोपींची रवानगी तुरुंगात

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस हवालदार एकनाथ खाडे, पोलीस शिपाई चांगदेव नेहे, पोलीस शिपाई सुभाष बोडखे, पोलीस शिपाई समर्थ गाडेकर यांनी गुन्ह्याची उकल केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/02/2025Updated:25/02/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २५ फेब्रुवारी –
नासिक पुणे महामार्गावर घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या रॉबरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात घारगाव पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी फिर्यादीत आरोपी निघाला असून त्याच्यासह चौघांच्या टोळीला पोलिसांनी मुद्देमालासह पकडले आहे. फिर्यादीने खोटी माहिती देत अन्य तिघांच्या साहाय्याने हा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे.
३१ जानेवारीला रात्री पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप मध्ये प्रवासी म्हणून संगमनेरला जाण्यासाठी बसलेल्या दोघाजणांनी पिस्तूलचा धाक दाखवत ट्रक चालकाला बेशुद्ध करून त्याच्या ताब्यातील सुमारे सहा लाख रुपये किमतीचे शेतीचे औषध लंपास केल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावर घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे या प्रकरणी तपास करत होते.
काय होती घटना… ३१ जानेवारीला मध्यरात्री दिपक किसन कदम (वय ४२ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. राजगुरूनगर, वाडा, ता. खेड, जि. पुणे) हा ५,७२,२१४ रुपये किंमतीची शेतीची औषधे भरलेली पिकअप (एम.एच. ४२ एक्यु. ८०७८) घेवुन पुणेकडुन नाशिककडे जात असताना चाळकवाडी टोलनाका येथुन दोन प्रवाशांनी लिफ्ट मागीतल्याने त्यांनी दोन प्रवाशी बसविले. त्यांना घेऊन कदम घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत माहुली घाट (खंदरमाळ) येथे आला असताना मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोघा प्रवाशांपैकी एका प्रवासाने बाथरूमला लागल्याचे सांगत पिकअप थांबविली. तर पिकअपमध्ये असलेल्या दुसऱ्या प्रवाशाने त्याच्याकडील गावठी कट्टा चालक कदम यांच्या कमरेला लावला. तर दुसऱ्या प्रवासाने ड्रायव्हर साईटने केबिनमध्ये चढत पांढरा रुमाल चालकाच्या नाकाला लावून बेशुद्ध केले.
पिकअप चालकाला सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शुद्ध आले असता तो पिकअपच्या हौदात होता. परंतु पिकअपमध्ये शेतीमालाची कोणतीही औषधे नव्हती. त्यामुळे त्याने गाडी मालकाला सदरचे घटना कळविली व आळेफाटा पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.
आळेफाटा पोलिसांकडून गुन्हा वर्ग… सदरचा गुन्हा घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने आळेफाटा पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी हा गुन्हा घारगाव पोलिसांकडे वर्ग केला होता. घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४),३(५) सह शस्त्र अधिनियम कलम ३, ३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते.
असा लावला छडा… पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांच्याकडे सोपविला होता. दाभाडे यांनी सर्व घटनाक्रम लक्षात घेत तपासाला सुरुवात केली. हिवरगाव पावसा व चाळकवाडी येथील टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फिर्यादीच्या मोबाईलचे सीडीआर काढण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दाभाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासांती आणखी माहिती मिळवत आरोपी साईदास रघुनाथ गाडेकर (वय २७ वर्ष, रा. रोहकल, चाकण, ता. खेड, जि. पुणे. मुळ रा. निमगाव निघोज, ता. राहाता. जि. अहिल्यानगर) यास ताब्यात घेवन त्याचेकडे तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा चालक दिपक किसन कदम (वय ४२ वर्षे, रा. वाडा, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे), तेजस प्रकाश कहाणे (वय २१ वर्षे, रा. वाडा, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे) व नवनाथ दादाभाऊ शिंदे (वय २८ वर्ष, रा. रोहकल, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांचे मदतीने केल्याचे कबूल केले. तसेच त्याचेकडुन गुन्हयातील जबरी चोरी गेलेला माल एम.एच. ४२ एक्यु. ८०७८ यामध्ये लपून ठेवला होता तो देखील ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी एकूण १५ लाख १२ हजार २१४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून यामध्ये शेती औषधांसह पीक अप, मोबाईलचा समावेश आहे.
कोठडी आणि यांनी केला तपास… अटक केलेल्या चारही आरोपींना संगमनेर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस हवालदार एकनाथ खाडे, पोलीस शिपाई चांगदेव नेहे, पोलीस शिपाई सुभाष बोडखे, पोलीस शिपाई समर्थ गाडेकर यांनी गुन्ह्याची उकल केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,813
कल्पेश दाभाडे खते घारगाव पोलीस यशस्वी तपास
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.