Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या कोरटकरला अटक करा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
राजकारण

इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या कोरटकरला अटक करा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

घाशीराम कोतवालाचे बगलबच्चे जर धमक्या देत असतील तर ते गंभीर आहे. याची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ‘हम करे सो कायदा’ आणि ‘घाशीराम कोतवाल करे सो कायदा’ हे महाराष्ट्रात चालणार नाही
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटाविषयी भूमिका मांडणारे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीला तात्काळ अटक करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

प्रशांत कोरटकर याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी आता ‘घाशीराम कोतवाल करे सो कायदा’ हे महाराष्ट्रात चालणार नाही, असा इशारा काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिला आहे.

इंद्रजीत सावंत यांना आलेल्या धमकीप्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट सरकारवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देताना वापरलेली भाषा आणि त्याचा आशय पाहता सरकार कोणत्या विचाराच्या लोकांना पुढे करत आहे हे दिसून येते.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील “छावा” चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी काँग्रेसने शिवजयंती दिनी केली होती, पण त्यावर सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, संभाजी महाराजांबददल सरसंघचालक गोळवलकर यांनी ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकात आणि सावरकरांनीही आक्षेपार्ह लेखन केले आहे. चिटणीसाच्या बखारीपासूनचा जो खेळ सुरू आहे त्याची पाठराखण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची या विषयावर चुप्पी आहे का? छावा चित्रपट प्रमोट करण्यात कुचराई करत आहेत का? असे प्रश्न असताना इतिहास अभ्यासक इंद्रजीत सांवत यांना ‘हे राज्य आमचे आहे’ अशी धमकी दिली जाते.

त्यामुळे मला विचारायचे आहे की, महाराष्ट्रात घाशीराम कोतवालाचे राज्य आहे का? जर घाशीराम कोतवाल महाराष्ट्राचा गृहविभाग चालवत असतील, तर ते कदापी खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा सपकाळ यांनी दिला. 

सावंत यांना धमकी देणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. परंतु हा धमकी देणारा पोलिसांच्या विश्रामगृहावर कसा थांबतो? त्याला सुरक्षा कशी पुरवण्यात आली? कोण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना या व्यक्तीची संपत्ती किती वाढली? हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे घाशीराम कोतवालाचे बगलबच्चे जर धमक्या देत असतील तर ते गंभीर आहे. याची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ‘हम करे सो कायदा’ आणि ‘घाशीराम कोतवाल करे सो कायदा’ हे महाराष्ट्रात चालणार नाही, अशा शब्दात हर्षवर्धन सपकाळ धमकीप्रकरणावर संताप व्यक्त केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 403
इंद्रजीत सावंत हर्षवर्धन सपकाळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  भारतीय संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्य, समानता आणि न्यायाच्या अधिकारांचे संरक्षण…

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.