
संगमनेर, दि. २७ फेब्रुवारी –
महिलांवरील अन्याय अत्याचाराविरोधात काम करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील महिलांकडून जागृत महिला मंचची स्थापना करण्यात आली आहे.
मंचच्या अध्यक्षपदी तळेगाव येथील साक्षी दिघे, उपाध्यक्षपदी नांदुरी दुमाला येथील अर्चना शेळके, सचिव पदी पेमगिरी येथील अर्चना वनपत्रे यांची निवड करण्यात आली आहे. सुनिता रोहिदास खताळ (धांदरफळ खुर्द), मंदा निळे (मिर्झापूर), ज्योत्स्ना कदम (संगमनेर), लक्ष्मी तूपसुंदर (गुंजाळवाडी), शितल पांडे (पिंपळगाव माथा), मुक्ता सांगळे, लता सावंत (पिंपळगाव माथा), निर्मला दिघे (तळेगाव) यांचे तालुका कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली आहे.

लोकपंचायत संस्थेच्या बहिणा प्रकल्पांतर्गत महिला अत्याचाराविरोधात काम करणाऱ्या महिलांनी एकत्रित येत मंगळवारी संगमनेर खुर्द येथे झालेल्या बैठकीत या संगमनेर शाखेची स्थापना केली. बैठकीसाठी तालुक्यातील २० गावांमधील महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. महिलांवरील अन्याय अत्याचार निवारणासाठी ही संघटना काम करणार आहे. या बैठकीत जागृत महिला मंच संघटनेची ध्येयधोरणे आणि कार्यक्रम ठरविण्यात आले.
बैठकीत जयश्री जाधव, सविता पांडे, स्मिता गाडेकर, सुरेखा उबाळे, वैष्णवी जुनागडे, अर्चना देशमुख आदींनी महिलांना मार्गदर्शन केले.


