Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विशेष लेख … रमजान महिना सुरू होतोय..!
महाराष्ट्र संवाद विशेष

विशेष लेख … रमजान महिना सुरू होतोय..!

या महिन्याचा खरा अर्थ समजला तर जीवनाचा मार्गच बदलतो आपण केवळ स्वतःच्या पोटाची भूक भागवणारे नसतो तर इतरांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरवणारे होतो आणि हेच रमजानचे खरे सौंदर्य आहे. आत्मशुद्धी परोपकार आणि प्रेमाचा उत्सव.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

राहुल जाधव पाटील

रमजान हा केवळ उपवास करण्याचा महिना नाही तर तो आत्मशुद्धी संयम आणि परोपकाराचा महिना आहे. या महिन्यात उपवास म्हणजे फक्त अन्न आणि पाणी टाळणे नसून आपल्या मनातील वाईट विचार ईर्ष्या लोभ आणि अहंकार यांना दूर करण्याचा सोहळा असतो.

सकाळी लवकर जेव्हा संपूर्ण जग शांत असते तेव्हा रमजानचे पहिले किरण मनावर उमटतात. कुटुंब एकत्र येऊन सेहरी घेतात. त्या क्षणी एकत्र असण्याचा आनंद डोळ्यांच्या कडा ओलावणारा असतो. असे कितीतरी लोक आहेत ज्यांना एकवेळचे अन्न मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. उपवासात केवळ भुकेची जाणीव होत नाही तर भुकेच्या वेदना सहन करणाऱ्या गरिबांचे दुःखही मनाला जाणवते.

दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी जेव्हा अजानचा आवाज कानावर पडतो तेव्हा मुस्लिम बांधवांना मनाला एक वेगळेच समाधान मिळते. पहिला घास तोंडात टाकताना वाटते अल्लाहने दिलेल्या या कृपेचे आपण कितीही आभार मानले तरी ते कमीच. रमजानमध्ये माणसाला आपल्या आयुष्यातील सगळ्या सुखसुविधांची किंमत कळते.

रमजान फक्त उपवासाचाच नाही तर या महिन्यात दानधर्म, गरीबांना मदत आणि दुसऱ्यांची दुःखं समजून घेणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. आपल्या समोरच्या ताटात भरपूर अन्न असताना रस्त्याच्या कडेला उपाशी झोपणाऱ्याचा विचार मनाला हेलावून जातो, म्हणूनच या महिन्यात फितरा आणि जकात देण्याची परंपरा आहे.

रात्रीच्या प्रार्थनेसाठी जेव्हा मुस्लिम डोळे मिटून हात वर उचलतात तेव्हा केवळ स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठीही दुआ मागितली जाते. हे अल्लाह प्रत्येक भुकेल्या पोटी अन्न मिळू दे, प्रत्येक पाण्यासाठी तहानलेल्या ओठांना पाणी मिळू दे, प्रत्येक दुःखी हृदयात आनंद भरू दे आणि शेवटी येतो तो ईदचा आनंद सोहळा.

पण हा सोहळा केवळ नवीन कपडे घालण्याचा किंवा स्वादिष्ट शिरखुर्म्याचा नसतो तर तो आत्मशुद्धीचा आपल्यातील बदलाचा आणि जगाकडे नव्या नजरेने पाहण्याचा असतो. रमजान आपल्याला शिकवून जातो की या जगात सगळ्यात मोठा खजिना हा पैसाच नाही तर माणुसकी सहानुभूती आणि प्रेम आहे.

या महिन्याचा खरा अर्थ समजला तर जीवनाचा मार्गच बदलतो आपण केवळ स्वतःच्या पोटाची भूक भागवणारे नसतो तर इतरांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरवणारे होतो आणि हेच रमजानचे खरे सौंदर्य आहे. आत्मशुद्धी परोपकार आणि प्रेमाचा उत्सव.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 515
रमजान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar09/10/20260

आजचे राशीभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला रासेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची…

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.