Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ: बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश; डॉक्टर, एजंटसह ९ आरोपींना अटक
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ: बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश; डॉक्टर, एजंटसह ९ आरोपींना अटक

धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी छापा टाकला, त्यावेळी तिथे बीड, संगमनेर, नाशिक, नांदगाव आणि पुणे यांसारख्या लांबच्या शहरांतून आलेल्या ८ महिला रांगेत होत्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/04/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, श्रीरामपूर:

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कायद्याची पायमल्ली करून बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा लोणी पोलीस आणि अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात सुरू असलेल्या या काळ्या धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून एका बीएएमएस डॉक्टरसह त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, रोख रक्कम आणि तीन आलिशान कारसह तब्बल २४ लाख ९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या धक्कादायक प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना पिंपरी निर्मळ शिवारात निळवंडे कॅनॉलजवळ एका खोलीत महिलांची बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक तयार केले. या पथकात लोणीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वाती पवार, डॉ. गोकुळ घोगरे आणि दोन शासकीय पंचांचा समावेश होता.

पोलिसांनी अत्यंत चपळाईने सापळा रचून एका बनावट गरोदर महिला ग्राहकाला संबंधित ठिकाणी पाठवले. पिंपरी निर्मळ येथील त्या खोलीत बनावट महिला ग्राहक पोहोचल्यानंतर, तिथे लिंग निदानाची प्रक्रिया सुरू असल्याची खात्री झाली. सिग्नल मिळताच पोलिसांनी त्या घरावर छापा टाकला. यावेळी दोन खोल्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये दोन पुरुष आणि ती बनावट महिला आढळून आली. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, या काळ्या धंद्याचा सूत्रधार डॉ. राहुल आबासाहेब भनगे (वय ३४, रा. भानसहिवरे, ता. नेवासा) आणि त्याला मदत करणारा एजंट अभिजीत दिलीप भुसाळ (वय ३०, रा. पिंपरी निर्मळ, ता. राहता) असल्याचे निष्पन्न झाले. हे दोघेही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असून केवळ पैशांच्या हव्यासापोटी हा बेकायदेशीर उद्योग चालवत होते.

आरोपी प्रत्येक महिलेकडून १० हजार रुपये घेऊन पोर्टेबल यु.एस.जी. मशीनच्या साह्याने पोटातील गर्भ मुलगा आहे की मुलगी, याची माहिती देत असत. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी छापा टाकला, त्यावेळी तिथे बीड, संगमनेर, नाशिक, नांदगाव आणि पुणे यांसारख्या लांबच्या शहरांतून आलेल्या ८ महिला रांगेत होत्या. या सर्व महिला ३ ते ४ महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांना स्विफ्ट, एर्टिगा आणि वॅगनार कारमधून या ठिकाणी आणले गेले होते. या महिलांचे नातेवाईक जवळील बाभळेश्वर येथे थांबले होते. पोलिसांनी या सर्व गाड्या आणि वैद्यकीय साहित्य जप्त केले आहे.

या प्रकरणी डॉ. स्वाती पवार यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट १९६१ आणि पीसीपीएनडीटी कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, कोमल कुमावत, बेबी शिंदे, दादासाहेब लोढे, संदिप दरंदले, सचिन धनाड, अशोक गाडे, राजेंद्र बिरदवडे, असिर सय्यद, साईनाथ राशिनकर, सचिन शेवाळे, भोईटे आणि मनिषा गिरी यांच्या पथकाने पार पाडली. या कारवाईमुळे अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,220
पोलीस कारवाई बेकायदा गर्भलिंग निदान सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar19/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक राहील. कार्यक्षेत्रात नवीन संधी…

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.