
सोमवार, दि. ३ मार्च
सोमवारी विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून विधानभवनात दाखल झाले. थेट बेड्या घालून आलेल्या आव्हाड यांच्यामुळे काही वेळ नेमकं काय घडलं याची चर्चा सुरू होती.
आव्हाड यांनी याचं स्पष्टीकरण देत सांगितले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकारकडून घाला घातला जात आहे. गुन्हे दाखल केले जात आहेत. मूलभूत अधिकार शाबूत राहिले पाहिजे. यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

अमेरिकेत भारतीय नागरिकांवर अन्याय करण्यात आला आहे. त्यांना विमानात कोंबून भारतात पाठवल्या जाणं म्हणजे अपमानित करण्याचा प्रकार आहे. लोक भोगत असलेल्या यातना या बेड्यांपेक्षा कमी नाही, असं देखील ते म्हणाले.
दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे बघावयास मिळत आहे. अधिवेशनात त्यांच्याकडून सरकारवर निशाणा सादर सरकारला धारेवर धरले जात असल्याचे दिसून आले.


