Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » औरंगजेबाची भलामण करणारे अबू आझमी नरमले.. शिवराय, शंभूराजे श्रेष्ठच.. माझ्या वक्ताव्यांचा विपर्यास करण्यात आला
राजकारण

औरंगजेबाची भलामण करणारे अबू आझमी नरमले.. शिवराय, शंभूराजे श्रेष्ठच.. माझ्या वक्ताव्यांचा विपर्यास करण्यात आला

समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांना औरंगजेबाचं समर्थन करणं भोवलं आहे. त्यांच्याविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाची भलामण केलेल्या वक्तव्यापासून माघार घेत आपलं वक्तव्य मागे घेत असल्याचं जाहीर केलं. आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. आज त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्या विधानावरून सभागृहात गोंधळ घातला. परिणामी, विधीमंडळाचं आजचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

अबू आझमी यांनी आज विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी व्यक्त केलेल्या संतप्त प्रतिक्रिया पाहून मवाळ भूमिका घेत आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. ते म्हणाले, मी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. माझ्या वक्तव्यामुळं अर्थसंकल्पीय अधिवेशन बंद पाडल्याने जनतेचं नुकसान होत आहे. इतिहासकार आणि लेखकांनी औरंगजेबाबद्दल जे सांगितलं आहे, तेच मी बोललो आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा अन्य कोणत्याही महापुरुषांबद्दल मी अवमानकारक बोललेलो नाही. मात्र, तरीही माझ्या वक्तव्यामुळं कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द, वक्तव्य मागे घेतो, असं आमदार आझमी यांनी स्पष्ट केलं आहे.

माझ्या वक्तव्याला विनाकारण राजकीय मुद्दा बनवला जात असून त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला बंद करणं, हे महाराष्ट्रातील जनतेचं नुकसान करण्यासारखं असल्याचं मला वाटतंय, असंही अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

आझमी विरोधात गुन्हा… समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांना औरंगजेबाचं समर्थन करणं भोवलं आहे. त्यांच्याविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करणं, हिंदूंच्या भावना दुखावणं, सरकार विरोधात अपप्रचार करणं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आझमी यांच्या विरोधात ठाण्यात शिवसेना आक्रमक झाली. शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे पोलीस ठाण्यात आझमी यांच्या विरोधात सोमवारी घोषणाबाजी करण्यात आली. अबू आझमींनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त शिवसैनिकांनी केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 380
अबू आझमी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला…

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.