Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कोयत्याचा धाक दाखवून दहशत व लुटमार करणारी ‘कोयता गॅंग’ संगमनेर डीवायएसपीच्या पथकाने पकडली, पाच आरोपीत दोघा अल्पवयीन मुलांचा समावेश
गुन्हेगारी

कोयत्याचा धाक दाखवून दहशत व लुटमार करणारी ‘कोयता गॅंग’ संगमनेर डीवायएसपीच्या पथकाने पकडली, पाच आरोपीत दोघा अल्पवयीन मुलांचा समावेश

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, प्रमोद चव्हाण व अनिल उगले यांच्या पथकाची कामगिरी.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ६ मार्च – प्रतिनिधी
कोयत्यासह घातक शस्त्रांचा धाक दाखवून दहशत निर्माण करत लूटमार करणाऱ्या संगमनेरमधील कोयता गॅंगला पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या पथकाने पकडले आहे. पकडलेल्या पाच आरोपींमध्ये दोघा अल्पवयीन आरोपींचा समावेश असून त्यांच्याकडून घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गणेश बबन कुरकुटे (वय २३), सार्थक उल्हास कुरकुटे (वय २०) व प्रथमेश शांताराम दुधवडे (वय १९, सर्व रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे असून यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांचा आरोपीमध्ये समावेश आहे. आरोपींना न्यायालयाने शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी दिली असून आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेजारच्या पुणे जिल्ह्यामध्ये बहुचर्चित आणि धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गॅंगची सर्वत्र दहशत निर्माण झाली असताना याच पार्श्वभूमीवर या आरोपींना संगमनेरमध्ये देखील आपली दहशत निर्माण करण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला असल्याचे समोर येत आहे.
१५ जानेवारीला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर सांडपाणी टाकण्यासाठी गेलेल्या महिलेला चार अनोळखी लोकांनी कोयत्याचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र तसेच तिच्या भावजयीला देखील या गॅंगने कोयत्याचा धाक दाखवत मनी मंगळसूत्र, कानातील वेल बळजबरीने काढून पळून गेले होते. याशिवाय पांडुरंग माधव ढेरंगे यांच्या गळ्यातील चैन, त्यांच्या पत्नीचे मिनी गंठण आणि आईच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र, कानातील सोन्याचे दागिने काढून हे आरोपी पसार झाले होते.
या संदर्भात घारगाव (संगमनेर) पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. घारगाव पोलीस आरोपींचा शोध घेत होते मात्र त्यांना आरोपींचा ठावठिकाणा लागत नव्हता. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांनी आपल्या पथकाला या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पथकातील पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण व पोलीस कॉन्स्टेबल अनिल उगले आरोपींच्या मागावर होते.
कोयत्याच्या सहाय्याने दहशत माजवत लूटमार करणारी काही जणांची टोळी संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथे असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षकांना मिळाली होती. त्यानंतर उपाधीक्षकांनी तातडीने आरोपींना पकडण्यासाठी आपले पथक कुरकुटवाडी येथे पाठविले होते. या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे पाच जणांना पकडले असून त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. चौकशीमध्ये आरोपींनी घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या दोन गुन्ह्यांची कबुली दिली असून या आरोपींकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,940
कोयता गॅंग गुन्हेगारी घारगाव पोलीस पोलीस उपाधीक्षक पथक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.