Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

August 2, 2026

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

August 2, 2026

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गॅंगच्या म्होरक्याला नाशिक पोलिसांनी संगमनेरमधून उचलला… काय आहे प्रकार
गुन्हेगारी

पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गॅंगच्या म्होरक्याला नाशिक पोलिसांनी संगमनेरमधून उचलला… काय आहे प्रकार

संगमनेर शहरालगत गुंजाळवाडी शिवारात होते आरोपीचे वास्तव्य
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 12, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १२ मार्च
दरोडा, जबरी चोरी, जिवे मारण्याचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाच्या पाच गुन्ह्यांमध्ये पोलिसांना गुंगारा देणाऱ्या म्हस्के गँगच्या म्होरक्याला संगमनेरमधील गुंजाळवाडीमध्ये नाशिक पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने शिताफिने जेरबंद केले आहे. संगमनेरमध्ये मंगळवारी या पथकाने कारवाई केली. आरोपीला उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सागर उर्फ सोनू सुरेश म्हस्के (वय २९, रा. भालेराव मळा, जय भवानी रोड, नाशिक रोड) असे संशयित म्होरक्याचे नाव आहे. दरोड्याच्या तयारीत असलेल्या त्याच्या टोळीला यापूर्वीच बेड्या ठोकल्या होत्या. तर फरार असलेल्या म्होरक्याला पकडण्यात आता यश आले आहे.
गेल्या २३ नोव्हेंबर रोजी जय भवानी रोडवरील शकुंतला पेट्रोल पंप परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पोलिसांनी पकडली होती. पकडलेल्या संशयितांच्या ताब्यातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, कोयता, दोर, मिरची पूड असा ऐवज जप्त केला होता.
या कारवाईदरम्यान अंधाराचा फायदा घेऊन टोळीचा म्होरक्या असलेला संशयित आरोपी सागर म्हस्के फरार झाला होता. नाशिक पोलीस त्याच्या मागावर होते. संशयित आरोपी संगमनेरमध्ये दडून बसलेला असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळाली होती.
आरोपी संगमनेरमध्ये नेमका कोठे आहे याची माहिती पथकाला मिळत नव्हती. त्याचा कोणताही ठाव ठिकाणा माहीत नसताना पथकाने मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तो शहरालगतच्या गुंजाळवाडीमधील लक्ष्मीनगरमध्ये असल्याची माहिती मिळविली. आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पथकाने गुंजाळवाडीत त्याचा शोध सुरू केला असता आरोपीला याची चाहूल लागल्याने त्याने दुचाकीवरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि ताब्यात घेतले.
त्याच्या विरोधात उपनगर आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून गुन्हे शाखेचे आयुक्त संदीप कर्णिक, उपयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, सुनील आडके, प्रवीण चव्हाण, अशोक आघाव, सुनीता कवडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,751
गुंडा विरोधी पथक नाशिक पोलीस कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

August 2, 2026

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

By अनंत पांगारकरAugust 2, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  मुंबई:  फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आमदार सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावरून केलेल्या…

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

August 2, 2026

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.