Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगरच्या गुन्हे शाखेला संगमनेरच्या काकडवाडीच्या महालक्ष्मी मंदिरातील चोरीचा उलगडा करण्यात यश, सहा आरोपींची टोळी पकडली
गुन्हेगारी

अहिल्यानगरच्या गुन्हे शाखेला संगमनेरच्या काकडवाडीच्या महालक्ष्मी मंदिरातील चोरीचा उलगडा करण्यात यश, सहा आरोपींची टोळी पकडली

आरोपींकडे चौकशी केली असता काकडवाडी मंदिरातील चोरी पकडलेल्या साथीदारांच्या मदतीने केल्याची तसेच आरोपींनी संगमनेरच्या घटनेपूर्वी दोन दिवस अगोदर गुरुवारी (६ मार्च) कुंदेवाडी, सिन्नर जि. नाशिक येथील बालाजी मंदिर व सिन्नरच्या पुणे-नाशिक रस्त्यावरील वज्रेश्वरी मंदिरात चोरी केल्याची तसेच चोरी केलेले दागिने सचिन मंडलिक यांच्या मध्यस्थीने विक्री करण्यासाठी अहिल्यानगर येथे नेत असल्याचे कबूल केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/03/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि. १४ मार्च – प्रतिनिधी

शनिवारी रात्री संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातून झालेल्या देवीच्या दागिने चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात आहिल्या नगरच्या गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या पथकाने लोणी कोल्हापूर मार्गावर गुरुवारी सहा जणांचे टोळी पकडली असून संगमनेर सह आणखी काही गुन्ह्यांची आरोपींनी कबुली दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे.

सुयोग अशोक दवंगे (वय २१, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), संदीप किसन साबळे (वय २३, रा. पाचपट्टावाडी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर), संदीप निवृत्ती गोडे (वय २३, रा. सोमठाणे, ता. अकोले, जि. अहिल्यानगर), अनिकेत अनिल कदम (वय २१, रा. टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे), दीपक विलास पाटेकर (वय २४, रा. टिटवाळा, ता. कल्याण, जि. ठाणे) व सचिन दामोदर मंडलिक (वय २९, रा. संगमनेर, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहे.

अज्ञात चोरट्याने मंदिराचा दरवाजा व गाभाऱ्याचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोप, चांदीच्या टोपामधील सोन्याचे पान, मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने असे सुमारे २५ लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते. या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ११६/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने देखील भेट देऊन तपास सुरू केला होता.

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार सागर ससाने, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालनकर, भगवान थोरात, फुरखान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, अरुण मोरे यांचे पथक आरोपींच्या शोधात होते. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचा आधारे सदरचा गुन्हा हा संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील सुयोग अशोक दवंगे यांनी त्याच्या साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपींच्या मागावर असलेल्या पथकाला सुयोग दवंगे हा त्याचा साथीदार सचिन मंडलिक यांच्या मदतीने चोरलेले दागिने विक्री करण्यासाठी एका पोलो कारमधून संगमनेरहून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे जाणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यामुळे पथकाने लोणी-कोल्हार रस्त्यावर सापळा लावला होता. पथकातील कर्मचाऱ्यांनी संशयित पोलोकार (एम.एच. ०४ एच.एफ १६६१) पकडली. पोलिसांनी पकडल्याचे लक्षात येतात कारमधील तिघेजण पळून जाऊ लागले, मात्र पथकातील काही जणांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. पळणाऱ्या तिघांसह कारमधील आणखी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून सुमारे २६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपींकडे चौकशी केली असता काकडवाडी मंदिरातील चोरी पकडलेल्या साथीदारांच्या मदतीने केल्याची तसेच आरोपींनी संगमनेरच्या घटनेपूर्वी दोन दिवस अगोदर गुरुवारी (६ मार्च) कुंदेवाडी, सिन्नर जि. नाशिक येथील बालाजी मंदिर व सिन्नरच्या पुणे-नाशिक रस्त्यावरील वज्रेश्वरी मंदिरात चोरी केल्याची तसेच चोरी केलेले दागिने सचिन मंडलिक यांच्या मध्यस्थीने विक्री करण्यासाठी अहिल्यानगर येथे नेत असल्याचे कबूल केले. पकडलेल्या सर्व आरोपींना संगमनेर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,877
उकल काकडवाडी गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.