
अकोले, दि. १९ मार्च – प्रतिनिधी
महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अकोले तालुक्यातील आंबड येथील गवनेर दामू सरोदे यांच्या विरोधात अकोले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून ग्रामस्थांचा अकोलेकरांनी सोमवारी (17 मार्च) कोल्हार घोटी मार्ग बराच काळ रोखून धरला होता. दरम्यान या प्रकरणावरून अकोल्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गवनेर सरोदे याच्यावर कारवाईसाठी सामाजिक संघटना नेते कार्यकर्ते अंबड ग्रामस्थांचं अकोले सरांनी महामार्गावर रास्ता रोको करत टायर जाळत निषेध व्यक्त केला. शिवसेना (ठाकरे) तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, संभाजी ब्रिगेडचे डॉक्टर संदीप कडलग, मनसे अध्यक्ष दत्ता नवले, रोहिदास जाधव, रामदास भोर आदीसह नागरिक उपस्थित होते.
महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा सरोदे हा तालुक्यातील अंबड गावचा रहिवासी आहे. ग्रामस्थांनी त्याचा सभा घेऊन निषेध केला. तसेच सरपंच सुरेखा हासे, उपसरपंच प्रमोद भोर आदींनी कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले आहे. रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव विजयराव वाकचौरे यांनी देखील कारवाईची मागणी केली आहे.

वंचित आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी देखील या घटनेचा निषेध करत सरोदे याचा वंचित बहुजन आघाडीशी संबंध नसल्याचे सांगितले आहे.
सरोदे याच्या गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहे. त्याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करू, असे आश्वासन पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी दिले आहे.

महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल… कोल्हार-घोटी मार्ग रोखला, तणावपूर्ण वातावरण
सरोदे याच्या गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहे. त्याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करू, असे आश्वासन पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी दिले आहे.

