Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करून खून, बडतर्फ पोलिसासह दोघांना अटक
गुन्हेगारी

खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करून खून, बडतर्फ पोलिसासह दोघांना अटक

१० कोटी रुपयांच्या मागणीसाठी त्यांचे अपहरण करण्यात आले आणि नंतर गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/03/2025Updated:19/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि. १९ मार्च –

अहिल्यानगर शहरातील बेपत्ता व्यापारी दीपक लालसिंग परदेशी (वय ६८) यांचे खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. १० कोटी रुपयांच्या मागणीसाठी त्यांचे अपहरण करण्यात आले आणि नंतर गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली.

या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी एका बडतर्फ पोलिसासह दोघांना अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. किरण बबन कोळपे (वय ३८, रा. विळद, ता. अहिल्यानगर) आणि त्याचा साथीदार सागर गीताराम मोरे (वय २८, रा. ब्राह्मणी, राहुरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांनी खुनाची कबुली दिली असल्याचे तपासी अधिकारी आणि तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी सांगितले.

दीपक परदेशी हे चितळे रस्त्यावर फर्म चालवत होते आणि बोल्हेगाव उपनगरात राहत होते. ते २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते आणि त्यांच्या पत्नीने दुसऱ्या दिवशी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी केलेल्या तपासात, परदेशी यांचे अपहरण करून अधिक रक्कम उकळण्याचा डाव आरोपींनी रचल्याचे समोर आले. त्यांनी परदेशी यांना बोल्हेगाव येथून इंडिका गाडीत बसवून १० कोटी रुपयांची मागणी केली. झटापटीत सागर मोरेने परदेशी यांचे हात बांधले आणि नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला.

त्यानंतर निंबळक बाह्यवळण रस्त्यावर मृतदेह सिमेंटच्या बंदिस्त नालीत टाकण्यात आला. पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली इंडिका गाडी आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. पुढील तपास सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 957
अपहरण क्राईम गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

By Annant Ppangarkar18/09/20260

आजचे राशिभविष्य ​मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता…

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.