Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डोंगराला लागलेल्या भीषण आगीत गुराख्यासह गाईचा होरपळून मृत्यू; म्हसवंडी परिसरात शोककळा
अपघात

डोंगराला लागलेल्या भीषण आगीत गुराख्यासह गाईचा होरपळून मृत्यू; म्हसवंडी परिसरात शोककळा

सरपंच मंगेश बोडके यांनी वनविभागाकडे जाधव यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे म्हसवंडी परिसरात दुःखाचे वातावरण पसरले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील म्हसवंडी गावच्या परिसरात मंगळवारी दुपारी एका दुर्दैवी घटनेत डोंगराला लागलेल्या भीषण आगीत एका गुराख्याचा आणि त्याच्या एका गाईचा होरपळून मृत्यू झाला.

सिताराम तुकाराम जाधव (वय अंदाजे ५० वर्षे) असे मृत गुराख्याचे नाव आहे. ते म्हसवंडी गावच्या परिसरातील जाधव वस्ती येथे वास्तव्यास होते आणि जनावरे चारण्याचा व्यवसाय करत होते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सिताराम जाधव हे त्यांच्या गाई चरायला घेऊन वनविभागाच्या हद्दीत गेले होते. दुपारच्या सुमारास अज्ञात कारणांमुळे डोंगरावर आग लागली. वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली आणि जाधव तसेच त्यांच्या गाई आगीच्या कचाट्यात सापडले.

आगीची तीव्रता इतकी जास्त होती की, सिताराम जाधव आणि त्यांची एक गाय जागीच होरपळून मरण पावले. या दुर्घटनेत त्यांची आणखी एक गाय गंभीररित्या भाजली गेली आहे.

सायंकाळपर्यंत सिताराम जाधव घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. रात्रभर शोध घेऊनही ते सापडले नाहीत. बुधवारी सकाळी कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी पुन्हा शोध मोहीम सुरू केली, तेव्हा त्यांना डोंगरावर सिताराम जाधव आणि त्यांच्या गाईचे जळालेले मृतदेह आढळून आले. ही हृदयद्रावक घटना पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

या घटनेची माहिती तातडीने म्हसवंडीचे सरपंच मंगेश बोडके यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ वनविभाग आणि घारगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने, पोलीस नाईक ज्ञानेश्वर मरभळ, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर आणि चालक मुसळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरला पाठवला आहे.

सरपंच मंगेश बोडके यांनी वनविभागाकडे जाधव यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे म्हसवंडी परिसरात दुःखाचे वातावरण पसरले असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. डोंगरांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने वनविभागाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,639
आग मृत्यू म्हसवंडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.