Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; दर्शन घेऊन परतणारे बोटा येथील ५ भाविक गंभीर जखमी
अपघात

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; दर्शन घेऊन परतणारे बोटा येथील ५ भाविक गंभीर जखमी

वाहनात अडकलेल्या जखमींना तात्काळ बाहेर काढून आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/06/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
घारगाव (संगमनेर):
कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील गुळंजवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात बोटा येथील पाच भाविक गंभीर जखमी झाले.
पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील बोटा (ता. संगमनेर) या आपल्या गावाकडे कारने परतत असलेल्या भाविकांच्या कारला (कार क्रमांक एम एच १४ एन डी ३३७८) समोरून येणाऱ्या दुसऱ्या पिकअप वाहनाने (एम एच २४ बी डब्लू २८६२) जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या दुर्घटनेत कारमधील जिजाभाऊ दत्तात्रय शेळके, चालक शिवाजी शांताराम मेंगाळ, बाळासाहेब भागाजी मुसळे, सुभाष तुकाराम शेळके आणि आनंदा रामभाऊ मधे (सर्व रा. बोटा, ता. संगमनेर) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक गुळंजवाडी ग्रामस्थ आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या समयसूचकतेमुळे वाहनात अडकलेल्या जखमींना तात्काळ बाहेर काढून आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला सारत वाहतूक पूर्ववत केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 473
अपघात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.