Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

आज, बुधवार १५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ऊस उत्पादनात एआय तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक, माजी मंत्री थोरात यांचा परखड सल्ला
शेती व सहकार

ऊस उत्पादनात एआय तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक, माजी मंत्री थोरात यांचा परखड सल्ला

तालुक्याची ही चांगली वाटचाल सर्वांना जपायची असून सध्या तालुक्यात लाईट नाही, पाणी पळवले जात आहे, याकडे नवीन लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही,"
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 20, 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २० मार्च – प्रतिनिधी

“सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकरी ऊस उत्पादन वाढवणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आता आगामी काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना उसासंबंधीची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होईल,” असे स्पष्ट मत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन बाबासाहेब ओहोळ होते, तर व्यासपीठावर मा. आ. डॉ. सुधीर तांबे, सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, बाजीराव पा. खेमनर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

थोरात यांनी भविष्यातील तंत्रज्ञानावर भर देत पारंपरिक पद्धतींना आता बदलावे लागेल, असे ठासून सांगितले. “आजकाल इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती होत आहे आणि लवकरच ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या येतील. त्यामुळे आपण काळासोबत चालले पाहिजे,” असे ते म्हणाले.

आपला सहकार महाराष्ट्रात आदर्शवत असल्याचे सांगत “या कारखान्याने नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत काळानुसार बदल केले आहेत. ५५०० मे. टन क्षमतेचा कारखाना असून ३० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे. मागील वर्षात पाच कोटी युनिट वीज वितरित केली असून रिकव्हरी चांगली राखली आहे,” असे नमूद केले.

“आपण कायम चांगले व प्रामाणिक काम केले. कुणापेक्षाही आपण सरस आहोत. सहकार चांगला आहे आणि आपली राजकारणाची पद्धत व परंपरा चांगली आहे. ती टिकवायची आहे. हे सर्व मोडून काढण्याचा प्रयत्न होणार आहे, पण त्या ठिकाणी वेळीच प्रतिकार आपण केला पाहिजे,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करताना थोरात म्हणाले, “कारखान्यामध्ये अनेक चाके रात्रंदिवस फिरत असतात. मोठ्या परिश्रमातून हे काम चालते. ऊस तोडणी कामगार रात्री-अपरात्री काम करतो, वाहतूक, कारखान्याचे यंत्र, हे सर्व अविरतपणे सुरू राहते. हे मोठे काम आहे आणि याला कायम ईश्वराचा आशीर्वाद मिळत असतो.”

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, “सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे तत्त्व घेऊन शेतकरी व सर्वसामान्य जनतेची तळमळ असलेले व्यवस्थापन येथे आहे. संगमनेरच्या सहकाराचा अत्यंत शुद्ध भाव असून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देण्याची परंपरा या कारखान्याने कायम जपली आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन हे या सहकाराचे वैशिष्ट्य राहिले आहे.”

कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांनी मागील पाच वर्षातील प्रगतीचा आढावा घेतला. “कारखान्याने इथेनॉल व अल्कोहोल निर्मितीमध्ये विस्तारीकरण केले आहे, वीज निर्मिती चांगली होत आहे, कारखान्यावरील कर्ज फेडले आहे. नवीन प्रशासकीय इमारत उभी राहिली आहे. चांगला भाव देण्याचे काम कारखान्याने केले आहे. तालुक्याची ही चांगली वाटचाल सर्वांना जपायची असून सध्या तालुक्यात लाईट नाही, पाणी पळवले जात आहे, याकडे नवीन लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही,” अशी टीका त्यांनी केली.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. दुर्गाताई तांबे यांनी कांचनताई यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.

ठळक मुद्दे:

 * सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना ऊस गळीतात जिल्ह्यात अव्वल.

 * अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा सहकारी साखर कारखान्यात पहिला क्रमांक.

 * हंगामात ८ लाख २५ हजार ९०० मेट्रिक टन ऊस गाळप.

 * वेळेत शेतकऱ्यांचे पेमेंट करण्याबाबतही पहिल्या क्रमांकावर.

 * ऊस दराच्या बाबतीतही जिल्ह्यात अव्वल.

 * वीज उत्पादन आणि निर्यातीतही जिल्ह्यात पहिला क्रमांक

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 767
गळीत हंगाम सांगता थोरात कारखाना बाळासाहेब थोरात सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

July 13, 2026

संगमनेरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून स्वागत व पूजन

July 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

By अनंत पांगारकरJuly 15, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून…

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

आज, बुधवार १५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 15, 2026

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.