Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चालकाने रचला चौघांना जाळण्याचा कट! हिंजवडीतील जळीत कांडात धक्कादायक खुलासा
गुन्हेगारी

चालकाने रचला चौघांना जाळण्याचा कट! हिंजवडीतील जळीत कांडात धक्कादायक खुलासा

हिंजवडी परिसरात आल्यावर तमन्ना सर्कलजवळ उतारावर असताना त्याने गाडीला आग लावली आणि स्वतः उडी मारून आपला जीव वाचवला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पुणे, दि. २० मार्च – 

हिंजवडी येथे एका धावत्या मिनी बसने अचानक पेट घेतल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या जळीत कांडात व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरुवातीला हा अपघात असल्याचे सांगण्यात आले, मात्र आता पोलिसांनी केलेल्या तपासात चालकानेच कट रचून या चौघांना जाळल्याचे उघड झाले आहे.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी बसचा चालक जनार्धन हंबर्डे याने पूर्वनियोजित कट रचून हे कृत्य केले. त्याने गाडीमध्ये एक लिटर बेंझीन सोल्युशन केमिकल आणून ठेवले होते. त्यासोबत कापड्याच्या चिंध्या आणि काडीपेटीही त्याने आधीच गाडीत ठेवली होती. तपासात गाडीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. उलट, ड्रायव्हर सीटखाली काडीपेटी सापडल्याने पोलिसांना संशय आला आणि कसून चौकशी केल्यावर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला.

हिंजवडी परिसरात आल्यावर तमन्ना सर्कलजवळ उतारावर असताना त्याने गाडीला आग लावली आणि स्वतः उडी मारून आपला जीव वाचवला.

आरोपी जनार्धन हंबर्डे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचा कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांशी वाद होता. ज्या कर्मचाऱ्यांना तो रोज कामावर घेऊन जात असे, त्यांच्यावरही त्याचा रोष होता. दिवाळीचा बोनस न मिळाल्याने आणि ड्रायव्हिंग व्यतिरिक्त मजुरीची कामे सांगितल्याने तो नाराज होता. याच रागातून त्याने कंपनीत मोठा अनर्थ घडवण्याचा कट रचला आणि चौघांचा जीव घेतला.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी चालकावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये आणि मृतांच्या कुटुंबीयांमध्ये शोक आणि संतापाचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,557
आग गुन्हेगारी जळीत दुर्घटना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.