Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » न्यायदंडाधिकारी समितीच्या अहवालामुळे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खळबळ; मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र संवाद विशेष

न्यायदंडाधिकारी समितीच्या अहवालामुळे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खळबळ; मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह

अहवालात सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या अहवालामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, दि. २१ मार्च – विशेष प्रतिनिधी

परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. न्यायदंडाधिकारी समितीने नुकताच या प्रकरणाचा अहवाल राज्य मानवाधिकार आयोगाकडे सादर केला आहे. या अहवालात सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या अहवालामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून, विरोधकांनी गृह मंत्रालय आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

न्यायदंडाधिकारी समितीच्या अहवालानुसार, सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कोठडीत असताना गंभीर मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूर्यवंशी यांचा मृत्यू श्वसनाच्या त्रासामुळे झाल्याचे विधान केले होते. मात्र, न्यायदंडाधिकारी समितीच्या अहवालामुळे मुख्यमंत्र्यांचे हे विधान खोटे ठरले आहे.

या अहवालावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, “गरीबांची जान काय जान नाही? हा प्रश्न आज महाराष्ट्रातील सामान्य माणूस विचारत आहे. शोषित, वंचित समाजातील सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी इतकी जबर मारहाण केली की, त्यांचा मृत्यू झाला. आम्ही विधानसभेत विचारले, त्यांना मारले कोणी? तेव्हा सरकारने सांगितले, त्यांना श्वसनाचा त्रास होता. पण आज सत्य बाहेर आले आहे. मुख्यमंत्रीच खोटे बोलले.”

काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणात सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “सोमनाथ सूर्यवंशी यांचा खून झाला आहे. दलित तरुणाचा खून लपवणे अत्यंत चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.”

राज्य मानवाधिकार आयोग आता या अहवालावर काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणातील दोषी पोलिसांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 962
देवेंद्र फडणवीस न्याय दंडाधिकारी समिती अहवाल राज्य मानवाधिकार आयोग सोमनाथ सूर्यवंशी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.