Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026

आज बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

26/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवार विशेष लेख | नागपूरची सरकार पुरस्कृत दंगल…
विश्लेषण

रविवार विशेष लेख | नागपूरची सरकार पुरस्कृत दंगल…

लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/03/2025No Comments5 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये घडलेल्या घटनेची दखल आता सर्वदूर घेतली जाऊ लागली आहे. राज्य आणि केंद्र सरकार या दंगलीकडे एकांगाने पाहणार हे अगदी स्पष्टपणे दिसू लागल्याने यामागच्या डोक्याची चिरफाड करणं अत्यंत गरजेचं आणि तितकंच आवश्यक बनलं आहे. सरकार पुरस्कृत दंगल कशी असते हे नागपूरच्या घटनेने दाखवून दिलं. सरकारी पक्षाची लोकं भाजपचे नेते आणि यंत्रणा या दंगलीनंतर ज्याप्रकारे आग ओकण्याचं काम करत आहेत, ते पाहिलं तर ही दंगल सरकार पुरस्कृतच आहे, असं चित्र आहे. सरकारला विकली गेलेली माध्यमं आणि शासकीय यंत्रणांकडून यातलं खरं काय ते कळू देलं जात नाही. तरी समाजमाध्यमांनी केलेला पोलखोल सारं काही सांगून जात आहे. यामुळेच कोणत्याही परिस्थितीत समाज माध्यमांच्या मुसक्या आवळण्याचं काम प्रगतीने सुरू आहे. अशा घटनांमध्ये सरकारचाच हात आहे, असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा यासाठी काम करणार्‍यांची गणती करता येत नाही. सत्तेतील सगळेच यासाठी झटत तरी असतात किंवा मूग गिळून गप्प तरी बसतात. आपलं काम भागलं की मग ते हव्या असलेल्यांना दोष द्यायला त्या मोकळ्या असतात. 
नागपूरमध्ये असंच घडलं. नागपूर हे गोंड बख्त बुलंद राजाने वसवलेलं शहर. आठरा पगड लोकं राहत असल्याने शहर तसं शांत. आदिवासी आणि आंबेडकर चवळवळीचा मोठा इतिहास या नागपूरला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा ज्या नागपूरने दिले ते बुध्द धर्माची दीक्षा देणारं देशातलं एकमेव शहर. दीक्षा भूमीपुढे नतमस्तक होण्यासाठी लाखो लोक नागपूरला भेट देत असतात. दुसरीकडे ताजुद्दीन बाबांचा दर्गाही या शहरात. हा दर्गा म्हणजे मुस्लिमांचं पुज्य स्थान. तिसरीकडे जगभर हिंदुत्वाचा प्रसार करण्यासाठीचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालयही याच शहरात. असं असताना नागपूरने सलोखा सोडला नाही. हिंदूंच्या रामनवमीच्या शोभा यात्रांचं स्वागत इथला मुस्लिम करतो, तेव्हा सलोख्याचं वेगळंपण उठून दिसतं. या शहराने वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी झालेली अनेक आंदोलनं पाहिलीत. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळचं आंदोलनही या शहराने पाहिलं. अशा कठीण परिस्थितीतही असं कधी घडलं नव्हतं. 
हिंदूंचं केंद्रस्थान असूनही धर्मापासून दूर झालेल्यांप्रती वैरभाव नव्हता. अपवाद १९६८ ची दंगल. हिंदू-मुस्लिम दंगलीत सारं बेचिराख होत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अथक प्रयत्नाने दंगल शमली. तुकडोजी महाराज कर्करोगाने अंतरुणावर होते. त्यांनी नागपूरमधील जाणते समाजसेवक रतनभाई डागा यांच्यासह शहरातील धर्मगुरूंना मोझरीच्या आश्रमात पाचारण केलं आणि प्रार्थना सभेत त्यांनी माणुसकीचा मंत्र देताना देशाचं मोठेपण जपण्याचा संदेश दिला आणि दंगल शमली. आता एकही महाराज या भूमीत नाही. ज्यांच्याकडे जबाबदारी आहे तेच समाजात दुहीची पेरणी करतात. तसे एकमेकाला समजून घेणारे अनेक आहेत. दुही निर्माण करणारे एखाद्या घटनेचा गैरफायदा घेत आगीत तेल ओतण्याचं काम करतात. नागपूरमध्ये हेच घडलं.
राज्यात फडणवीसांच्या नेतृत्वात मोठ्या बहुमताचं सरकार स्थापन झाल्यापासून सरकारी पक्षातील लोकं ज्या प्रकारची भाषा वापरून समाजात दुही पसरवतात ते पाहिलं की ही घटना नागपूरबाहेर गेली नाही, हे आपलं नशिब. १७ मार्चच्या दुसर्‍या दिवशी सगळ्याच वर्तमानपत्रात ‘पूर्वनियोजित’ या एका शब्दात दंगलीचं कवित्व गायलं गेलं. वृत्त वाहिन्यांच्या वाचाळपणाची करावी तितकी कींव कमीच. औरंगजेबाची कबर हे निमित्त. पण त्याआधी भाजपचा पुरस्कार करणारे राहुल सोलापूरकर, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापासून अगदी अमित शहांपर्यंतच्या गोताळ्यात सहज फेरफटका मारणारे प्रशांत कोरटकर या संघाशी संबंधितांच्या तोंडून छत्रपती शिवरायांविषयीच्या व्यक्त झालेल्या विकृत भावना. त्यांच्याविषयी शिवप्रेमींमध्ये निर्माण झालेली चिड, हे सारं नागपूर दंगलीच्या मागचं कारण होय. छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांच्यावर अश्‍लाघ्य टीका करणार्‍यांना सरकारी पक्षाने आणि त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी त्यांना पाठिशी घातलेलं कोणालाच रुचलेलं नव्हतं. अशा व्यक्तींवर कारवाई करताना सरकार आणि यंत्रणांनी घेतलेल्या अखडत्या हातांनी दंगलीची मशागत केलेली दिसते.
यातच फडणवीस सरकारमधले बंदरविकास मंत्री नितेश राणे यांच्या तोंडी मुस्लिमांविषयीची व्यक्त होणारी भाषा लक्षात घेता राज्यात असं घडण्याचाच प्रयत्न होत असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. हीच दंगलीची पूर्वनियोजित तयारी होती. तरीही राणे यांना एका शब्दाने रोखलं जात नव्हतं. यातून औरंगजेबाची कबर उघडण्याची टूम निघते. बजरंगदल आणि विश्‍व हिंदू परिषद उघडपणे याचं समर्थन करतात, त्यासाठी आंदोलन छेडतात तरीही सरकार त्यांचं काही वाकडं करत नसेल तर दंगल कोणी घडवली हे सांगायची आवश्यकता नाही. होळीच्या रात्री राजापुरात हे घडायचं. जामा मशिदीच्या मुख्य दरवाजाला धडक देणारे याच मानसिकतेचे. त्यांच्यावरही अद्याप कारवाई झाल्याचं दिसत नाही.
राज्य आज असंख्य संकटांचा सामना करत आहे. कसाबसा येणार्‍या कृषी मालावर दलालांनी केलेल्या कब्जाने शेतकरी पुरता रसातळाला गेला आहे. दररोज होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या विषय महाराष्ट्राची लाज रस्त्यावर आणत आहे. गेल्या वर्षभरात राज्यात २७०६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय. यात सर्वाधिक अमरावतीचे शेतकरी आहेत. मुख्यमंत्री विदर्भातील असूनही आत्महत्या रोखल्या जात नसतील तर ती मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी लाजीरवाणी गोष्ट होय. सरकार घरबसल्या महिलांना एकीकडे रमणा वाटत असताना दुसरीकडे शेतकरी मात्र देशोधडीला लागला आहे. निवडणुकीच्या प्रचारात शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्याचं आश्‍वासन दिलं. ते पूर्ण करणं शक्य नाही, बेरोजगारांच्या हाताला काम देण्यात सरकार नाकाम ठरलंय. या आणि अशा असंख्य समस्यांच्या ओझ्यातून लोकांचं लक्ष इतरत्र वळवण्याचा सरकारी प्रयत्न आता सहज लक्षात येतो.
हे प्रश्‍न सोडवण्याऐवजी साडेतीनशे वर्षांपूर्वीची औरंगजेबाची कबर सत्तेला महत्वाची वाटत असेल तर यासारखं दुर्देवं नाही. विशेष म्हणजे याला खतपाणी स्वत: मुख्यमंत्री घालत असतील तर? दुर्देवाने औरंगजेबाच्या कबरीला सुरक्षा द्यावी लागते, असं वक्तव्य मुख्यमंत्री करत असतील तर त्यांचा रोख काय आहे, हे लक्षात यायला वेळ लागत नाही. शिवजयंतीच्या मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो पेटवणं असल्या गोष्टी कोणी सहज घडवत नसतं. यामागे मास्टर माईंड लपलेला असतो. त्याला सत्तेचं पाठबळ असल्याविना तो इतक्या उचापत्या करू शकत नाही. फडणवीस ज्या पोलिसांची भलामण करतात त्या नागपूर पोलिसांना शहरात असं काही घडत आहे, याचा अंदाज येऊ नये?
एखाद्या कथित परिपत्रकाची प्रतिकात्मक होळी करण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करतात तेव्हा त्यांच्यावर पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई करतात. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करतात. नागपूरमध्ये प्रतिकात्मक कबर बनवली जाते. ती उखडण्याची, त्यावरील चादर जाळण्याची घटना घडत असताना पोलीस बघ्याची भूमिका कसे काय घेऊ शकतात? एक पोलीस उपायुक्त मुख्यमंत्री फडणवीस यांची कोण भलामण करतात याचा अर्थ काय? बजरंग दल आणि विश्‍वहिंदू परिषद यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही त्यांच्या मुसक्या आवळता आल्या असत्या. तर काहीच घडलं नसतं. पण इथेही पोलिसांनी दुर्लक्ष केलं. मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर, असा हा सारा प्रकार होता. १७ मार्चच्या सकाळी नऊच्या दरम्यान या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते कबर हटाओचा नारा देतात. यासाठी बनवलेली पेंढ्याची प्रतिकात्मक कबर पेटवून देतात. त्यावर चढवण्यात आलेली चादर जाळतात तरी पोलीस मख्ख उभेच. जाळण्यात आलेली चादर ही धार्मिक होती, अशी अफवा पसरवणार्‍यांनी आपलं काम फत्ते केलं. नाकाबंदी करून संबंधितांच्या मुसक्या आवळल्या असत्या, आंदोलकांची तुरूंगवारी झाली असती तर पुढच्या घटना टाळणं पोलिसांना अशक्य नव्हतं. मात्र जे सरकारी पक्षाला, त्यांच्या संघटनांना आणि यंत्रणेला नको होतं. म्हणूनच दंगलीने मान वर काढली. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यातल्या दोन गटांना स्वतंत्र वागणूक देण्याच्या प्रकरणाकडेही गंभीरपणे पाहिलं पाहिजे.
(लेखकाशी संपर्क भ्रमणध्वनी – ८१६९१३५२५३)
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 666
नागपूर दंगल प्रवीण पुरो
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष लेख — अर्बन नक्षल ते दिमागी नक्षल

23/08/2026

रविवार विशेष लेख — शास्त्रज्ञांविरोधी कट हनीट्रॅपिंगचा

16/08/2026

रविवार विशेष लेख — रामाचं सोंग आणि धर्माचं ढोंग!

09/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

By Annant Ppangarkar26/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील डोळासणे परिसरातील नागरिकांच्या…

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026

आज बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

26/08/2026

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.