Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

रविवार विशेष लेख— साहिलचा मृत्यू; शिक्षणाच्या मंदिरातील प्रश्न आता टाळता येणार नाहीत!

27/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » त्र्यंबकेश्वरच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ११०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता – मुख्यमंत्री फडणवीस
धार्मिक

त्र्यंबकेश्वरच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ११०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता – मुख्यमंत्री फडणवीस

या कामांना पुढील महिन्यात सुरुवात करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र कायदा आणि प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

त्र्यंबकेश्वर दि. २३ मार्च –

त्र्यंबकेश्वरच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ११०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देऊन या आराखड्याचा आढावा घेतला. या आराखड्यात प्रामुख्याने दर्शनासाठीचा कॉरिडॉर, पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहे, कुंडांचे संवर्धन आणि ब्रह्मगिरी पर्वतरांगांच्या नैसर्गिक सौंदर्याचा विकास यांचा समावेश आहे.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “त्र्यंबकेश्वरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संपूर्ण अध्यात्मिक व्यवस्थेत या तीर्थक्षेत्राला खूप मोठे स्थान आहे. त्यामुळे, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकसोबतच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे, यासाठी ११०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

या आराखड्याची कामे दोन टप्प्यांत पूर्ण होतील. पहिला टप्पा सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होईल. यामध्ये, दर्शनासाठीचा कॉरिडॉर, पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहे, कुंडांचे संवर्धन आणि आवश्यक सुविधांचा समावेश असेल.”

ब्रह्मगिरी पर्वतरांगांच्या नैसर्गिक सौंदर्याचा विकास करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. “ब्रह्मगिरी आणि परिसरातील निसर्गरम्य स्थळांना चालना देण्यासाठी नैसर्गिक ट्रेल्स विकसित करण्यात येतील. नाशिकमध्ये ११ पूल आणि मोठे रस्ते बांधण्यात येत आहेत. साधुग्रामचा विकासही करण्यात येत आहे. तसेच, घाटांची संख्या वाढवून तेथे अधिकाधिक सुविधा पुरवण्यात येतील.

गोदावरी नदीचे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे. या सर्व कामांसाठी मोठा निधी लागणार असून, सरकार म्हणून आम्ही तिघे (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देऊ,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

या कामांना पुढील महिन्यात सुरुवात करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र कायदा आणि प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. “अध्यात्माची बाजू साधुसंत सांभाळतील, तर प्रशासकीय कामकाज प्राधिकरण बघेल,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 981
कुंभमेळा त्र्यंबकेश्वर नाशिक निधी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026

देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे

25/09/2026

प्रवराकाठी ‘एकविरा’चे ४५० शिलेदार; डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जन अन् निर्माल्य संकलन अभियान यशस्वी

25/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

By Annant Ppangarkar27/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आगामी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी…

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

रविवार विशेष लेख— साहिलचा मृत्यू; शिक्षणाच्या मंदिरातील प्रश्न आता टाळता येणार नाहीत!

27/09/2026

वाढदिवस विशेष लेख — व्हिजनरी लीडर सत्यजित तांबे

27/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.