Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात, विखे साखर कारखान्यांच्या निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती, प्रांताधिकारी शैलेश हिंगे संगमनेर तर प्रांताधिकारी माणिक आहेर प्रवरानगर कारखान्याचे निवडणूक अधिकारी
निवडणूक

थोरात, विखे साखर कारखान्यांच्या निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती, प्रांताधिकारी शैलेश हिंगे संगमनेर तर प्रांताधिकारी माणिक आहेर प्रवरानगर कारखान्याचे निवडणूक अधिकारी

थोरात यांनी प्रवरा कारखान्यात तर विखे यांनी संगमनेर कारखान्यात लक्ष घातल्यास या दोन्ही नेत्यांना निवडणुका जड जाण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकांकडे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि. २५ मार्च

येत्या काही दिवसात संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

संगमनेर कारखान्यासाठी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील.

तर प्रवरानगर येथील विखे पाटील कारखान्यासाठी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राहात्याचे तहसीलदार अमोल मोरे हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने या नियुक्त्यांचे आदेश जारी केले आहेत.

संगमनेरचा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तर प्रवरानगरचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखाना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. पुढील आठवड्यात या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राहुरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रमही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या कारखान्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे बाकी आहे. सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या माहितीनुसार, विखे आणि थोरात साखर कारखान्यांच्या प्रारूप मतदार यादीवर कोणतीही हरकत न आल्याने ती अंतिम करण्यात आली आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसात या दोन्ही कारखान्याच्या निवडणुकांचा धुराळा उडणार असून गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कारखान्याच्या निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. विवेक कोल्हे यांनी थोरात यांच्या मदतीने गणेश सहकारी साखर कारखाना विखेंच्या ताब्यातून आपल्या ताब्यात आणण्यात यश मिळविले होते. थोरात यांनी प्रवरा कारखान्यात तर विखे यांनी संगमनेर कारखान्यात लक्ष घातल्यास या दोन्ही नेत्यांना निवडणुका जड जाण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकांकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,087
थोरात कारखाना निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी विखे पाटील कारखाना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दुष्काळाच्या तीव्र संकटामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती…

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.