Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाचखोरीचा पर्दाफाश: दुय्यम निबंधक खताळ लाच घेताना रंगेहात जेरबंद
गुन्हेगारी

लाचखोरीचा पर्दाफाश: दुय्यम निबंधक खताळ लाच घेताना रंगेहात जेरबंद

खताळ यांनी या कामासाठी तक्रारदाराकडे १०,००० रुपयांची लाच मागितली. त्यानंतर, २६ मार्च २०२५ रोजी तक्रारदाराने आणखी एका जमिनीच्या विक्रीचा दस्त नोंदवण्यासाठी खताळ यांच्याकडे दिला. यावेळी खताळ यांनी या कामासाठी ५००० रुपयांची लाच मागितली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/03/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर दि. २६ मार्च – 

अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) श्रीगोंदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मोठी कारवाई करत सचिन पांडुरंग खताळ या दुय्यम निबंधकाला ५००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.

तक्रारदार हे वकील असून जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी श्रीगोंदा येथील गट क्रमांक ११७१ मधील ५ हेक्टर ६८ आर क्षेत्रापैकी २८ आर जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या खरेदी विक्रीचा दस्त नोंदवण्यासाठी तक्रारदारांनी दुय्यम निबंधक सचिन खताळ यांच्याकडे दिला होता.

खताळ यांनी या कामासाठी तक्रारदाराकडे १०,००० रुपयांची लाच मागितली. त्यानंतर, २६ मार्च २०२५ रोजी तक्रारदाराने आणखी एका जमिनीच्या विक्रीचा दस्त नोंदवण्यासाठी खताळ यांच्याकडे दिला. यावेळी खताळ यांनी या कामासाठी ५००० रुपयांची लाच मागितली.

लाच मागणी पडताळणी दरम्यान, खताळ यांनी तक्रारदाराकडून ५००० रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, एसीबीने सापळा रचून खताळ यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे. खताळ यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक राजू आल्हाट करत आहेत.

पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस नाईक चंद्रकांत काळे पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब कराड व पोलीस हेडकॉन्स्टेबल दशरथ लाड यांनी ही कारवाई केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,369
दुय्यम निबंधक लाच लुचपत लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या पडलेल्या प्रदीर्घ…

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.