Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरचा रहिवासी असलेल्या बँक शाखाधिकाऱ्याकडून साडेपाच कोटींचा अपहार; आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास
गुन्हेगारी

संगमनेरचा रहिवासी असलेल्या बँक शाखाधिकाऱ्याकडून साडेपाच कोटींचा अपहार; आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास

गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि फसवणुकीचा आकडा यापेक्षा अधिक आहे का, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नाशिक, दि. २७ मार्च – 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रच्या गंगापूर रोडवरील थत्तेनगर येथील ॲग्री हायटेक शाखेतील तत्कालीन शाखाधिकारी सुभाष विठ्ठल कौटे (वय ४०, रा. संगमनेर) यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत तब्बल ५ कोटी ५५ लाख ६६ हजार ५१३ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कौटे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणातील अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा न करता ती स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेतली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे.

कौटे यांनी ३६ खातेधारक शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे मंजूर करताना संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जाची रक्कम कमी असताना ती जास्त असल्याचे दाखवले. तसेच, कर्ज खाते नसतानासुद्धा कर्ज खाते असल्याचे भासवून त्या खात्यात कर्जप्रकरणातील अनुदानाची रक्कम मंजूर केली. त्यानंतर, ही रक्कम कर्जदारांच्या बचत खात्यात वर्ग न करता स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेतली.

फिर्यादी शाखाधिकारी बी. बी. बेहरा यांनी केलेल्या जोखीम आधारित लेखापरीक्षणात हा घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी कौटे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि फसवणुकीचा आकडा यापेक्षा अधिक आहे का, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या कार्यक्रमांतर्गत कर्जदाराला ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तपासणी व पडताळणी झाल्यावर संबंधितांचे कर्ज खाते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सुरू करण्यात येते. या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने तीन वर्षांसाठी कर्जाची रक्कम जमा होत असते. ही रक्कम कर्जदारांच्या कर्ज खात्यात जमा करण्याऐवजी कौटे यांनी बचत खात्यात जमा केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,648
आर्थिक गुन्हे शाखा फसवणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या पडलेल्या प्रदीर्घ…

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.