Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रमजान ईदमधून बंधुत्व आणि मानवतेचा संदेश – बाळासाहेब थोरात
धार्मिक

रमजान ईदमधून बंधुत्व आणि मानवतेचा संदेश – बाळासाहेब थोरात

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी रमजान ईदच्या शुभेच्छा देताना सांगितले की, "रमजान ईद जगभरात आणि भारतात मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. या काळात महिनाभर उपवास केले जातात. ईश्वराच्या जवळ जाण्याचा उपवास हा मार्ग आहे आणि तो अंतःकरणाच्या शुद्धीसाठी केला जातो."
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/03/2025Updated:31/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ३१ मार्च – प्रतिनिधी

“भारत हा विविध धर्म, पंथ आणि जातींचा देश असला तरी, मानवता आणि भारतीयत्व या दोन गोष्टी आपल्याला एकत्र जोडतात. रमजान ईद हा पवित्र सण, एक महिन्याच्या उपवासानंतर साजरा केला जातो. जगभरातील मुस्लिम बांधव हा सण मोठ्या आनंदात आणि पवित्र भावनेने साजरा करतात, ज्यात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात. एकता ही भारतीय संस्कृतीची मुख्य बाब आहे आणि रमजान ईद हा बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देतो,” असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

ईदगाह मैदानावर रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, विश्वास मुर्तडक, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर टोकसे, गणेश मादास, किशोर कालडा, नितीन अभंग, जीवन पंचारिया, गजेंद्र अभंग, लक्ष्मण बर्गे, अभय खोजे, शकील पेंटर, शफी तांबोळी, जावेद शेख, कन्हैया कागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “राष्ट्रपिता महात्मा गांधींनी उपवास हा परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग असल्याचे सांगितले आहे. उपवासामुळे जीवनातील पवित्रता वाढते. रमजान महिना आनंद आणि प्रेरणा देणारा आहे. भारतीय संस्कृतीत विविधता असून, सर्वधर्म समभावामुळे आपण एकमेकांचे सण आनंदाने साजरे करतो. हीच आपल्या देशाची ताकद आहे.

रमजान ईद जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जातो आणि ती बंधुत्व, प्रेम आणि मानवतेचा संदेश देते. सर्वधर्मसमभाव आणि मानवता वाढल्याने देशाची खरी ताकद वाढेल आणि प्रगती होईल.”

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी रमजान ईदच्या शुभेच्छा देताना सांगितले की, “रमजान ईद जगभरात आणि भारतात मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. या काळात महिनाभर उपवास केले जातात. ईश्वराच्या जवळ जाण्याचा उपवास हा मार्ग आहे आणि तो अंतःकरणाच्या शुद्धीसाठी केला जातो.”

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, “भारतात अनेक धर्म आणि पंथ आहेत आणि सांस्कृतिक विविधता ही आपली परंपरा आहे. जात, धर्म आणि पंथ वेगवेगळे असले तरी, आपण भारतीय म्हणून एकत्र येऊन सण साजरे करतो आणि हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे.”

संगमनेर शहरातील मुस्लिम बांधव आणि इतर सर्वधर्मीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,141
जयश्री थोरात बाळासाहेब थोरात रमजान ईद सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने एमडी ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात…

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.