Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये रामकथेनिमित्त भव्य शोभायात्रा, भक्तीमय वातावरणात शहर दुमदुमले
धार्मिक

संगमनेरमध्ये रामकथेनिमित्त भव्य शोभायात्रा, भक्तीमय वातावरणात शहर दुमदुमले

शेकडो संगमनेरकर महिला पुरुषांसह या शोभायात्रेत माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या डॉ. जयश्री थोरात यांच्यासह आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम यादेखील सहभागी झाल्या होत्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १ एप्रिल – प्रतिनिधी

गोवत्स परमपूज्य श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या अमृतवाणीतून संगमनेर येथे ९ दिवस श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेच्या निमित्ताने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

मंगळवारी सकाळी निघालेल्या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात आणि सनई चौघड्याच्या सुरांनी संगमनेर शहर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेले होते. शेकडो संगमनेरकर महिला पुरुषांसह या शोभायात्रेत माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या डॉ. जयश्री थोरात यांच्यासह आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम यादेखील सहभागी झाल्या होत्या.

संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे १ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान गोवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या शुभारंभानिमित्त संगमनेरमधील चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरात राधाकृष्णजी महाराज यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली. त्यानंतर ‘प्रभू रामचंद्र की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा जयघोषात शोभायात्रेला सुरुवात झाली.

चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरापासून निघालेली शोभायात्रा रंगार गल्ली, लालबहादूर शास्त्री चौक, नगरपालिका, बाजारपेठ, तेली खुंट, मेनरोड, विठ्ठल मंदिर चावडी, अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बस स्थानक, नाशिक रोड मार्गे मालपाणी लॉन्स येथे पोहोचली.

शोभायात्रेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग… शोभायात्रेत महिला भाविकांनी डोक्यावर तुळस घेऊन भजनांमध्ये सहभाग घेतला. महिलांनी टाळ आणि टाळ्यांच्या तालावर ठेका धरला. प्रभू श्रीरामाची पालखी खांद्यावर घेऊन मिरवणुकीत संगमनेरकरांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

संगमनेरमध्ये ९ दिवस चालणाऱ्या या रामकथेत पहिल्या दिवशी श्रीराम कथा महात्म, दुसऱ्या दिवशी शिव पार्वती विवाह, तिसऱ्या दिवशी श्रीराम जन्मोत्सव, चौथ्या दिवशी बाललीला आणि धनुष्य यज्ञ, पाचव्या दिवशी श्रीरामलला आणि माता जानकी यांचा विवाह सोहळा आणि मिरवणूक, सहाव्या दिवशी वनवास प्रसंग संवाद, सातव्या दिवशी श्रीराम भरत शबरी भेट, आठव्या दिवशी रामचरित्र लंका विजय आणि नवव्या दिवशी प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,181
जयश्री थोरात दुर्गाताई तांबे नीलम खताळ राधाकृष्णजी महाराज श्रीराम कथा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संगमनेर येथील…

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.